Kolhapur Bazar Samiti Result : कोल्हापुरात महाविकास आघाडीची सत्ता कायम; भाजप-शिवसेनेची धूळधाण

Kolhapur APMC : विरोधकांचे एका जागेवर समाधान, अपक्ष उमेदवाराचा विजय
Kolhapur APMC
Kolhapur APMCSarkarnama
Published on
Updated on

Congress, NCP vs BJP : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना युतीला फक्ता एका जागेवर समाधान मानावे लागले. तर या निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचाही विजय झाला आहे. या बाजार समितीवरील आपली सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने कायम राखले आहे.

Kolhapur APMC
Nanded APMC Result News : अशोक चव्हाणांनी नांदेड बाजार समितीही राखली, भाजप-युतीला भोपळा..

दरम्यान, कोल्हापूर बाजार समितीची (Kolhapur APMC) मतमोजणी सुरू असताना सुरूवातीपासूनच महाविकास आघाडीची आघाडी असल्याचे दिसून आले. सात जागांचे निकाल हाती आले त्यातील पाच जागा महाविकास आघाडी (MVA) गटाच्या होत्या. तर एक जागा अपक्ष उमेदवाराची निवडून आली होती. त्यामुळे या बाजार समितीवर महाविकास आघाडी आपली सत्ता कायम राखणार, यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.

Kolhapur APMC
Kolhapur Bazar Samiti Result : कोल्हापूर बाजार समितीच्या मतपेटीत निघाल्या पाचशेच्या नोटा अन् चिठ्ठ्या; काय आहे प्रकरण?

या बाजार समितीची मतमोजणी सुरू असताना एक वेगळाच प्रकार समोर आला होता. मतमोजणी कर्मचाऱ्याला एका मतपेटीत पाचशेच्या दोन नोटा मिळाल्या. त्यासोबत काही चिठ्ठ्याही आढळून आल्या. त्यात या निडणुकीत पैशांचे वाटप केल्याचे सांगण्यात आले होत. तसेच निवडणुकीसाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना कानपिचक्या घेत काही सूचनाही केल्या होत्या. हे पैसे राज्य निवडणूक आयोगाकडे (Election Commission) जमा करण्याची विनंती एका प्रामाणिक मतदाने केली होती. या प्रकाराची कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभर चर्चा सुरू आहे.

Kolhapur APMC
Amalner Bazar Samiti Result : भाजपच्या तीन माजी आमदारांना धक्का देत राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची आघाडी

कोल्हापूर बाजार समिती दृष्टीक्षेपात

एकूण जागा - १८

आतापर्यंत लागलेले निकाल - १८

सत्ताधारी गट (काँग्रेस, राष्ट्रवादी,जनसुराज्य) - १६

विरोधी गट - (भजपा , शिंदे गट)- १

अपक्ष - १

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com