NCP Leaders Meet Amit Shah sarkarnama
महाराष्ट्र

NCP Politics : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना वगळून राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या भेटीला, नेमकं कारण काय?

Amit Shah Praful Patel Dhananjay Munde : मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांनी अमित शाहांची भेट घेतली.

Roshan More

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शाहांना भेटले आहेत. भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये दोन मंत्र्यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भेटीवेळी उपस्थित नाहीत. सुनेत्रा पवार यांना वगळून नेते अमित शाहांच्या भेटीला, असे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांनी अमित शाहांची भेट घेतली.मिळालेल्या माहितीनुसार ही भेट काल रात्री झाली आहे.

सुनेत्रा पवार या भेटीवेळी उपस्थित का नव्हता, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, आज त्यांच्या देवगिरी निवास्थानी देखील महत्त्वाची बैठक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडे पूर्वी असलेले अर्थखाते त्यांना पुन्हा मिळावे, यासंदर्भात ही बैठक असल्याची चर्चा आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडे असलेले अर्थखाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे घेतले होते. मात्र, आता हे खाते पुन्हा आपल्याला मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता थेट गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे. ही भेटी नेमकी कोणत्या कारणाने घेतली याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

मंत्रिमंडळाचा विस्तार...

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्याने मंत्रिमंडळाच्या विस्ताराची देखील चर्चा आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार असल्याची देखील चर्चा या भेटीच्या निमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT