NCP News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुंबईतील हालचालींमागे नेमके कारण काय?

Sunetra Pawar meets News : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गेल्या चार दिवसापासून दिल्ली दरबारी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.
ncp Logo
ncp Logo Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र, गेल्या काही दिवसापासून या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही बाजूकडून पूर्णविराम देण्यात आला होता. त्यामुळे एकत्र येण्याच्या चर्चा देखील थांबल्या होत्या. मात्र, रविवारी पुन्हा एकदा या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गेल्या चार दिवसापासून दिल्ली दरबारी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील त्यांच्या वाट्याच्या अर्थमंत्रिपदाबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे पुढे आले होते.

त्यानंतर रविवारी एकीकडे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) प्रमुख नेत्यांसोबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या होत्या, तर तिकडे ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत रविवारी महत्त्वाची बैठक घेणार आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये विलीनीकरणाबाबत जोरदार हालचाली सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी सकाळपासूनच मोठी खलबतं पाहायला मिळत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू असल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या या केवळ चर्चाच असल्याचे सांगत दोन्ही बाजूच्या नेत्याने एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट केले असतानाही दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

ncp Logo
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

दिल्लीहून परत आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळांसोबत मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जय पवार हेही उपस्थितीत होते. या भेटीनंतर भुजबळ यांनी अर्थखातं लवकरात लवकर राष्ट्रवादीला द्या एवढीच मागणी आम्ही फडणवीसांकडे केल्याचे भुजबळांनी सांगितले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार, फेरबदल होऊन 5 मंत्री बदलण्यात येणार अशा बातम्या येत आहेत त्या चुकीच्या आहेत. अशी कोणतीही चर्चा बैठकीत झाली नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले असले तरी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

ncp Logo
Jayant Patil on NCP Merger : 'राष्ट्रवादीचे विलीनीकरण आता सुतरामही शक्यता नाही,...', जयंत पाटलांनी कंडका पाडला

रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत रविवारी महत्त्वाची बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत दोन्ही गट एकत्र येणार का? याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी होणार का? याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com