Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! शहराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राजीनामा : आता 'या' नेत्याच्या नेतृत्वात काम करणार

Prakash Ambedkar welcomes NCP Leader : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अकोट शहराध्यक्ष संदेश घनबहादुर यांनी आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अकोट शहरात आयोजित कार्यक्रमात वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि गजानन गवई यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला.
Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Akola News, 02 Nov : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. अकोटमधील पक्षाचे शहराध्यक्ष संदेश घनबहादुर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत बारी समाजाचे राज्यस्तरीय नेते डॉ. श्याम नेमाळे यांनीही वंचितचा झेंडा हाती घेतला. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे अकोटमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. संदेश घनबहादुर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोट शहराध्यक्ष होते. त्यांनी आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अकोट शहरात आयोजित कार्यक्रमात वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि गजानन गवई यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीने अकोल्यात आपली राजकीय ताकद वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, बारी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष असलेले डॉ. श्याम नेमाळे यांनीही वंचितमध्ये प्रवेश केला आहे. बारी समाजातील एक महत्त्वाचा चेहरा वंचितच्या व्यासपीठावर आल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या सोशल इंजिनिअरिंगची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Sharad Pawar NCP
Bachchu Kadu Drought Relief Demand : दुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून बच्चू कडू आक्रमक; सत्ताधारी शिंदे शिवसेनेच्या आमदाराने सरकारलाच सुनावले!

वंचित बहुजन आघाडीने बारी समाजाला आपल्या चळवळीत अधिक सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे या घडामोडीतून दिसून येत आहे. पक्षप्रवेशाच्या वेळी डॉ. श्याम नेमाळे यांच्यासह बारी समाजातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

Sharad Pawar NCP
Gokul Politics : गोकुळच्या निवडणुकीपूर्वीचा महायुतीचा गेम आला समोर : अध्यक्षपदावरून वाद सुरू असतानाच चंद्रकांत पाटलांचा 'लेटर बॉम्ब' उघडकीस

दरम्यान, या कार्यक्रमात केवळ बारी समाजातीलच नव्हे, तर ओबीसी आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनीही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी विविध सामाजिक घटकांना सोबत घेऊन संघटनात्मक ताकद वाढवण्याचा वंचितचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे. एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अकोटमध्ये धक्का बसला असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने नव्या सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.