dilip Walse Patil Sharad Pawar Jayant Patil sarkarnama
महाराष्ट्र

NCP Merger Meeting : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आमदारांमध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा; मुंबईतील बैठकीत काय घडले?

NCP Merger dilip Walse Patil Sharad Pawar : शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र यायला हवे असे मत या चर्चेमध्ये मांडले गेले.

Roshan More

NCP Merger News : अजित पवारांच्या निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाबाबतची चर्चा थंडावली होती. ही चर्चा पुन्हा होणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, राष्ट्रवादीच्या विलिनीकरबाबत काल (मंगळवारी) दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झाली चर्चा झाली, असे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र यायला हवे असे मत या चर्चेमध्ये मांडले गेले. मंगळवारी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटची बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही राष्ट्रवादीची आमदार, नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची, आमदारांची एक बैठक पार पडली. यावेळी पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्षातील नेत्यांची भावना आपण एकत्र आले पाहिजे अशी आहे. सुनील तटकरे यांनी देखील एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले की, विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या याबाबत मला माहिती होते. माझा विरोध असल्याचे काही कारण नाही.

नेतृत्व कोणाचे?

सुनील तटकरे यांनी माझा विलिनीकरणाला विरोध नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांना नेता म्हणून स्वीकारायला हवे. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रावहिनींना नेता म्हणून घोषित करा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली नाही. त्याकाळात ते (शरद पवारांच्या पक्षातील नेते) विलिनीकरण कोणत्या टप्प्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देत होते. आणि आम्ही बोलण्याच्या स्थितीत नव्हतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT