

NCP Meeting: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांची अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी देवगिरी बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक विषय चर्चेला येणार होते, त्याचबरोबर चाकणकरांच्या राजीनाम्याबाबतही चर्चा होणार होती. पण याबाबत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याचं कळतंय. पण सातारा झेडीतील गोंधळ आणि नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना द्यावा लागलेला राजीनामा यामुळं सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं सुत्रांकडून कळतंय.
मंगळवारी रात्री उशीरा साडेनऊच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि आमदारांची बैठक संपली. या बैठकीत संघटनात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. यावेळी मकरंद पाटील यांनी त्यांना सातारा झेडपीत भाजपनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला डावलून अध्यक्षपदावर आपल्या उमेदवारांची नियुक्ती दरम्यान केलेल्या राजकारणाची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी सातारा झेडपीतून सत्ता गमावल्याबद्दल तसंच नाशिकच्या खरात प्रकरणाबद्दल पूर्ण माहिती घेतली आणि या दोन्ही प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली.
या बैठकीत सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कधी अर्ज भरणार यावरही चर्चा झाली. चर्चेनंतर येत्या ६ एप्रिल रोजी त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं. २३ एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळं आता दिवंगत अजित पवार यांच्या मतदारसंघातून सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.