

Sunil Tatkare News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाविषयी आपल्या माहिती नव्हते. अजित पवार याबाबत आपल्याला काही बोलले नव्हते, अशी भूमिका खासदार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर घेतली होती. त्यांनी विलिनीकरणाच्या मुद्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर देखील टीका केली होती. मात्र, आता दोन महिन्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील तटकरे म्हणाले, ' 'माझा विलीनीकरणाला विरोध होता अशातला काही भाग नाही. मला त्या गोष्टीची आधी माहिती होती.'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले, 'अजितदादांच्या अपघाती निधनामुळे विलिनीकरणाच्या संभाव्य परिस्थिती (सिनारियो) बदलला. पहिल्या तीन दिवस मी माध्यमांशी चर्चाच करू शकलो नाही. विलिनीकरण करू, वहिनींना नेता निवडा, असे त्यांनी म्हटले नाही.'
'आपण पाहिलं असेल दादांनी निर्णय (राष्ट्रवादी फूट) घेतल्यानंतर आता जे दादांवर प्रेम आहे असं बोलत आहेत त्यांनी दादांवर एकरी भाषेत टीका केली होती. लोकसभा हरल्यानंतर राजकीयदृष्ट्या दादा संपुष्टात आलेत, अशी वल्गना करणारे देखील महाभाग होते. आता त्यावर बोलण्याचे वेळ नाही. मात्र वेळ आल्यावर नक्की बोलेल', असे देखील ते म्हणाले.
अजितदादांचे शव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठाणच्या प्रांगणात ठेवले होते. पहिल्याच दिवशी काही जबाबदार नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. विलीनिकरणा टप्यात आलं होतं, चर्चा झाल्या होत्या. या तारखेला विलीनीकरण होणार होतं. नंतर एक व्हिडिओ दादा बैठकीला बसलेत ते सगळे आहेत तो व्हिडिओ सलग दोन दिवस त्या मुलाखती चालू राहिल्या. आम्ही सगळेच हादरलो होतो, असे देखील तटकरेंनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.