Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर माध्यमात व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण चर्चा पुन्हा प्रसार माध्यमात रंगल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. याबाबत सीएम फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
फडणवीस माध्यमाशी बोलताना म्हणाले, 'शेवटी ते दोन पक्ष आहेत, दोन्हीही स्वतंत्र पक्ष आहेत. त्या दोन्ही पक्षांचे निर्णय ते मिळून घेतील. त्यांच्या पक्षात शरद पवार (Sharad Pawar) साहेबांसारखे मोठे नेते आहेत. तिकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, पार्थ पवार आहेत. त्यामुळे मला असे वाटते की त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणे किंवा निर्णय करणे हे काय योग्य होणार नाही. त्यांचे त्यांचे निर्णय ते घेतील.'
याबाबत कोणताही निर्णय घेताना ते आम्हाला विचारात घेतील, कारण एनडीए युतीमधील आम्ही मोठे पार्टनर आहोत. त्यामुळे आज तरी या संदर्भात आम्ही त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, त्यांनी अद्यापर्यंत तरी आम्हाला या संदर्भांत काहीही विचारलेले नाही. जर त्यांच्या चर्चा सुरू असतील तर ते आम्हाला विचारतील, आम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ, असे यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना सीएम देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. आज आणि उद्या राज्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार असल्याचे सीएम फडणवीस यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.