NCP MLA Disqualification Case Result Sarkarnama
महाराष्ट्र

NCP MLA Disqualification Result : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरवण्याचं कारण काय? राहुल नार्वेकर म्हणाले...

NCP MLA Hearing News : अजित पवार गटातील सर्व आमदारांना अपात्र करा, अशी मागणी शरद पवार गटाची होती. मात्र,...

Mayur Ratnaparkhe

NCP MLA Disqualification Result : अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्यात आल्या असून, अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरविण्यात आले आहेत. शरद पवार गटाच्या आमदारांनाही पात्र ठरवलं गेलं आहे. कोणत्याच गटाचे आमदार अपात्र न ठरण्यामागे नेमकं काय कारण? याची सर्वांना उत्सुकता होती.

यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर( Rahul Narvekar ) म्हणाले, 'अजित पवार आणि शरद पवारांच्या गटांमधील वाद हा पक्षांतर्गत आहे. त्यामुळे कोणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळेच या आमदारांवर घटनेतील १० व्या परिशिष्टानुसार कारवाई करता येत नाही. त्याचबरोबर अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केली असंही म्हणता येत नाही. त्यामुळे पक्षातील सर्व आमदारांना पात्र ठरवण्यात येत आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी याबाबत मीडियाशी बोलताना म्हटले की, 'कोणत्याच गटाचे आमदार अपात्र न करण हा मध्यम मार्ग स्वीकारलेला दिसत आहे. कारण याबाबत कोणाला अपात्र केलं, तर ते सुप्रीम कोर्टात जातील आणि सुप्रीम कोर्ट कदाचित त्यांना म्हणेण की तुमची घाई आहे, महत्त्वाचं आहे या. पण कोणालाच अपात्र केलं नाही म्हटल्यावर तिथं काही घाई नाही, असाही विषय होऊ शकतो. या उद्देशाने कदाचित असे निर्णय झाले असतील. अपात्र झाले तरी त्यांना निवडणुकीला उभं राहता येतं, अशी साधारणपणे व्यवस्था आहे.'

निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बहाल केले. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. निकालात अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरवले गेले आहेत. यामुळे हा शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का आहे.

अजित पवार गटातील सर्व आमदारांना अपात्र करा, अशी मागणी शरद पवार गटाची होती. यासाठी शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रसे पार्टी अजित पवारांचीच यावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT