NCP MLA Disqualification Case Result : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचा असल्याचा निकाल गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. जो शरद पवार गटासाठी नाही म्हटलं तरी एक मोठा धक्का आहे. या अगोदर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. त्यानंतर आता अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अजित पवारांच्या बाजूने निकाल दिला आहे.
विधिमंडळातील बहुमत लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच असल्याचे जाहीर केले. या निकालानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार(Sharad Pawar) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार सुप्रिया सुळे वृत्तवाहिनीशी बोलतना म्हणाल्या, 'तुम्हाला माझी प्रतिक्रिया नेमकी कशावर हवी आहे. कॉपी पेस्टवर? जे शिवसेनेचं झालं तेच स्टेप बाय स्टेप राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं. त्यामुळे मला काही आश्चर्य किंवा काही वाटत नाही. कारण नियम, कायदे काहीच खरं नाही, सगळंच मोडायचं. जे शिवसेनेचं केलं तेच आमचं करायचं, असं आहे ते, यामध्ये नवीन काहीच नाही. क्रिएटिव्हिटीपण नाही.'
याचबरोबर 'वरचं फक्त नाव बदललं आहे. बाकी सगळं तेच आहे. दरवेळी जे उद्धव ठाकरेंबरोबर होतं, तेच महिनाभरानंतर शरद पवारांबाबत होतं. स्थानिक मराठी पक्ष जे आहेत, त्यांना कसं कमकुवत करायचं, त्यांच्यावर कसा अन्याय कराचा आणि मराठी अस्मितेचा अपमान करून, त्यांना कसं संपवून टाकायचं हे पाप अदृश्य शक्ती सातत्याने प्रत्येक कृतीतून करताना दिसत आहे,' असा आरोपही सुळे यांनी केला.
याशिवाय 'राहुल नार्वेकरांकडून दुसरी काय अपेक्षा करणार? त्यांच्याकडून अपेक्षा करणंच हास्यास्पद आहे. डेटाच सर्व काही सांगतो. त्यामुळे यात नवीन काहीच नाही, मला काही वेगळं अपेक्षित नव्हतं. त्यांनी आता सगळे नियम, कायदे, घटना सोडूनच काम चालवलं आहे,' असंही सुळे म्हणाल्या.
तसेच 'अदृश्य शक्ती सांगते आणि हे ड्राफ्टिंग करतात. हे मोठं दुर्दैवं आहे. महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांचा फार मोठा मान सन्मान होता, परंतु ते आता कॉपी पेस्ट करायला लागले त्यामुळे हे दुर्दैवी आहे,' अशा शब्दांमध्ये सुळे यांनी टीका केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.