Maharashtra Politics Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar: भुजबळ भाजपची 'स्क्रिप्ट' वाचतात, त्यांना जाधव हे कॉपी करतात, या दोघांनाही फडणवीस...

Maharashtra Politics: "जाधव यांच्यावर ज्या कार्यकर्त्यांनी शाई टाकली, त्या कृत्याचं आम्ही समर्थन करीत नाहीत.

Mangesh Mahale

Beed: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरु आहे. ते बीडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, आणि व्याख्याते नामदेव जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले.

"भुजबळ हे भाजपची स्क्रिप्ट वाचतात आणि त्यांना नामदेव जाधव हे कॉपी करतात, या दोघांनाही पुढे करणारे म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत,"असं म्हणत आमदार रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसह छगन भुजबळ, नामदेव जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

"नामदेवराव जाधव स्वतःला माता जिजाऊंचे वंशज समजतात. आता जी व्यक्ती माता जिजाऊंचं नाव चुकीच्या पद्धतीने घेते आणि वंशज आहे, असं सांगत आहे, अशांचा मी निषेध करतो. त्यांचं नाव घेऊन ते ते पुस्तक विकतात, व्यवसाय करतात, त्यांना आमदार व्हायचंय, जर आशा खालच्या विचाराचे व्यक्ती उद्या जाऊन काहीही बोलली आणि त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया देत असेल तर ते योग्य नाही," असे रोहित पवारांनी सांगितले.

"जाधव यांच्यावर ज्या कार्यकर्त्यांनी शाई टाकली, त्या कृत्याचं आम्ही समर्थन करीत नाहीत, मात्र ज्या हेतूने त्यांनी शाई टाकली, शरद पवार यांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न जाधवांकडून केला जात असताना काही कार्यकर्ते गप्प बसत नाहीत. मात्र त्या कार्यकर्त्यांना काही अडचण आली तर आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू," असं म्हणत रोहित पवार यांनी नामदेव जाधव यांना काळ फासणाऱ्या कार्यकर्त्यांची बाजू मांडली.

"नामदेवराव जाधव हे भुजबळांची भाषा बोलतात. त्यांची कॉपी करतात आणि भुजबळ साहेब जे काही बोलतात ते भाजपची स्क्रिप्ट वाचतात. या दोन्ही नेत्यांना कोणी पुढे केले असेल ? याचा अभ्यास केला तर नाव पुढे येते, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं," असा आरोप रोहित पवारांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT