Sunil Tatkare leadership issue Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजितदादांनी थांबवलेले राजीनामे मृत्यूनंतर मंजूर; राष्ट्रवादीत चाललयं काय ? तटकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Sunil Tatkare leadership issue: अजित पवार यांना भेटून सेलच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे राजीनामे सूपूर्त केले होते. त्यावेळी अजितदादांनी या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे नामंजूर केले होते. पण हे राजीनामे आता पक्षाकडून मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Mangesh Mahale

NCP Internal Conflict: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूला महिनापूर्ण झाला आहे. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य समोर येत आहे. अजित पवार हयात असताना म्हणजे 26 जानेवारी रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी अजितदादांकडे राजीनामे दिले होते.

अजित पवार यांना भेटून सेलच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे राजीनामे सूपूर्त केले होते. त्यावेळी अजितदादांनी या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे नामंजूर केले होते. पण हे राजीनामे आता पक्षाकडून मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या राजीनाम्यांमागे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दलची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे मंजूर करताना त्यांच्या राजीनामा देण्यामागील कारणे विचारणे अपेक्षीत असते. पण त्यांच्या राजीनाम्याची कारणे विचारात न घेता ते मंजूर करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पक्षातील कार्यकर्ते-पदाधिकारी नाराज असल्याची माहिती आहे. या घडलेल्या प्रकारावर पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले होते राजीनामे

१. मनोज व्यवहारे – प्रदेशाध्यक्ष, असंघटित कामगार विभाग.

२. सुभास मालपाणी – प्रदेशाध्यक्ष, उद्योग विभाग.

३. सचिन जाधव – प्रदेशाध्यक्ष, मोटार मालक वाहतूक संघटना.

राजीनामा पत्रात काय म्हटलं होते?

“लोकशाहीवादी पक्षात संघटनात्मक पातळीवर असमानता आणि न्यायालयीन तत्त्वांचा अभाव जाणवत आहे. वरिष्ठ पातळीवरून मिळणाऱ्या असहकार्यामुळे संघटना वाढवणे कठीण झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पदावर राहणे अशक्य झाल्याने भविष्यातील हानी टाळण्यासाठी आम्ही पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT