

Ladki Bahin Yojana News: महायुती सरकारची महत्वाची असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाढ करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे, येत्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस याबाबत घोषणा करतील, अशी शक्यता आहे. राज्य सरकारची ही योजना सुरु होऊन आता दीड वर्ष झाले आहे. पण योजनेचा हप्ता वाढलेला नाही.
योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. विधानसभेच्या निवडणूकीआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचीही घोषणा केली होती. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होईल,असं लाडक्या बहीणींना वाटलं होते. पण सरकारने त्यांची निराशा केली. यंदा मात्र अर्थसंकल्पात फडणवीस योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करतील अशी आशा लाडक्या बहिणींना आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचा २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर आता अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी फडणवीसांवर आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्प ६ मार्चला सादर होणार आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीतील नेत्यांनी लाडकी बहीण योजना हाताशी धरुन जोरदार प्रचार केला. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ १५०० रुपयांवरुन २१०० रुपये केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. निवडणुकीनंतर अशी कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
'२१०० करण्याचं निश्चितपणे काम सुरु आहे. जर आपल्याला शाश्वतपणे योजना सुरु ठेवायचीय तर आर्थिक शिस्त पाळावी लागेल, ३ टक्क्यांच्या वर जाता येणार नाही. बॅलन्स तयार करुन आम्ही दिलेलं आश्वासन नक्की पूर्ण करु,' अशा शब्द फडणवीसांनी गेल्या अर्थसंकल्पानंतर बहिणींना दिला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात फडणवीस आपला शब्द पाळतील का? याकडे 'लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचा निधीची रक्कम थेट बँक खात्यात (DBT) जमा होते. त्यासाठी e-KYC व आधार लिंक अनिवार्य आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.