Amol Mitkari Sarkarnama
महाराष्ट्र

Amol Mitkari : सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर अमोल मिटकरींनी केला 'तो' व्हिडिओ डिलीट

Amol Mitkari deleted Sharad Pawar video : आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत व्हिडिओ डिलीट केल्याची माहिती दिली तसेच सुप्रीम कोर्टाची माफी देखील मागितली.

Roshan More

Amol Mitkari News: सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओचा वापर करणाऱ्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फटकारले. त्यामुळे ज्या व्हिडिओमुळे न्यायलायने फटकारले तो व्हिडिओ अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटरवरून डिलीट केला आहे.

मिटकरी यांनी ट्विट करत व्हिडिओ डिलीट केल्याची माहिती दिली तसेच सुप्रीम कोर्टाची माफी देखील मागितली. मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी अनावधानाने माझ्या सोशल मीडिया टीमकडून एक व्हिडिओ ट्विट झाला. त्याचा अन्वयार्थ काढून आज सुप्रीम कोर्टासमोर वेगळ्या प्रकारे युक्तिवाद केल्या गेला. संबंधित व्हिडिओ डिलीट करून मी अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल मी सुप्रीम कोर्टाची माफी मागतो.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ वापरत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेला व्हिडिओ कोर्टात दाखवला.

कोर्टाने शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ वापरू नयेत, असे इलेक्टॉनिक परिपत्रक काढून अजित पवारांच्या सर्व उमेदवारांना सूचना केल्या. तसेच तुमची विचारधारा वेगळी आहे तर मग स्वतःच्या पायावर उभे राहा, असे देखील सुनावले.

मागील आठवाड्यात घड्याळ चिन्हाबाबत देखील कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे चिन्ह घड्याळ वापरले जात आहे त्या चिन्हे न्यायप्रविष्ट असल्याची जाहीर वर्तमानपत्रात देण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT