Rohit Pawar, Jayant Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar : जयंत पाटलांचं काम चांगलं, पण..., नाराजीच्या चर्चांवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

Rohit Pawar On Jayant Patil : "मी नाराज झालो आणि दरवाजा बंद करुन बसलो असं कधी दिसणार नाही. नगरला जे झालं त्यावेळी मी कोणत्या एका नेत्यावर टीका केली नव्हती. मी पार्टीच्या स्ट्रक्चरवर बोललो होतो."

Jagdish Patil

Rohit Pawar On Jayant Patil : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. शिवाय त्यांच्यात आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात काही वाद असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या सर्व प्रश्नावर रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना त्यांनी पक्षाचं कोणतंही पद माझ्याकडे नसल्याने मला निर्णय घेता येत नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, मी नाराज झालो आणि दरवाजा बंद करुन बसलो असं कधी दिसणार नाही.

नगरला जे झालं त्यावेळी मी कोणत्या एका नेत्यावर टीका केली नव्हती. मी पार्टीच्या स्ट्रक्चरवर बोललो होतो. ती माझी एकट्याची भूमिका नव्हती तर कार्यकर्त्यांची भूमिका होती, असं म्हणत त्यांनी जयंत पाटील यांच्याबाबतच्या वादाच्या चर्चांवर भाष्य केलं.

तसंच माझं आणि जयंत पाटील (Jayant Patil) साहेबांचं म्हणणं एकच आहे, ही पार्टी सर्वसामान्य लोकांची आहे. हा विजय केवळ सर्वसामान्य लोकांचा आणि पवारसाहेबांचा आहे, कोणा एकट्याचा नाही, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांना राज्यातील विजयाचं श्रेय दिलं जात आहे, त्यावर अप्रत्यक्षरित्या आक्षेप घेतला.

तसंच आपण प्रमुख पदाबाबत इच्छुक नसल्याचं सांगत प्रदेशाध्यक्ष पदावार दावा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, "निर्यण घेणं महत्वाचं असतं, अनेकांना पक्षांसोबत येण्याची इच्छा असते. परंतु, माझ्याकडे कोणतही पद नसल्याने मला निर्णय घेता येत नाही.

शिवाय जयंत पाटील सुप्रिया सुळे हे माझ्या पदाबाबत जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. प्रमुख पदाबाबात मी स्वत: इच्छुक नाही. जयंत पाटील चांगल काम करत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे. पण काम करता युवा विद्यार्थी सेलममध्ये काम करण्याची गरज आहे."

अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत

यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटातील अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा पुनरुच्चार केला. शिवाय जे लांब गेले परंतु विचारधारेच्या विरुद्ध भूमिका घेतली नाही असे लोक परत येतील असा दावा केला. रोहित पवार म्हणाले, "अधिवेशन होऊ द्या, फंड मिळू द्या त्यानंतर अनेक आमदार निर्णय घेतील.

खालच्या पातळीवर टीका केली नसेल आणि जे विरोधात फार बोलले नसतील त्यांच्याबाबत आम्ही विचार करु. शेवटी कोणाला पक्षात घ्यायचं याचा निर्णय वरिष्ठ घेतील. छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबाबतचा निर्णय पवारसाहेब घेतील." असं म्हणत त्यांनी फुटलेल्या आमदारांसाठी शरद पवार गटाची दारं खुली असल्याचे संकेत दिले.

आता आम्हाला जास्त जागा द्या

विधानसभेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला महाविकास आघाडीने जास्त जागा देण्याची मागणी पवार यांनी केली. ते म्हणाले, "लोकसभेत राष्ट्रवादीने मोठं मन दाखवून शिवसेनेला जास्त जागा दिल्या. मात्र आता विधानसभेला मविआने राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्या. आमचे 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा आहे. त्यासाठी काम करु द्या. जागावाटपाबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT