Assembly Election 2024 : विधानसभेसाठी 'मविआ'चा फॉर्म्युला ठरला? ठाकरे अन् पवार 'एवढ्या' जागा लढविण्याची शक्यता

Mahavikas Aghadi Assembly Election 2024 : लोकसभेतील दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चाचपणी सुरू केली आहे.
sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
sharad pawar | uddhav thackeray | Nana Patole Sarkarnama

उत्तर प्रदेशनंतर भाजपची ( bjp ) भिस्त असलेल्या महाराष्ट्रानेही महायुतीला जबर धक्के देणारे निकाल दिले. 48 पैकी महायुतीला 17 जागांवर समाधान मानावे लागलं आहे.

तब्बल 31 मतदारसंघात विजय मिळत महाविकास आघाडीनं महायुतीला अक्षरश: लोळवलं आहे. यानंतर महाविकास आघाडीनं ( Mahavikas Aghadi ) विधानसभेसकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.

महायुतीच्या निराशजनक कामगिरीनं राज्यात मरणपंथाला लागलेल्या काँग्रेसला या निकालानं काँग्रेसला या निकालानं नवसंजीवणी मिळाली आहे.

सलग दोन निवडणुकीतील पराभवानंतर पक्षानं फिनिक्स भरारी घेतली आहे. 2019 मध्ये केवळ 1 जागा जिंकणाऱ्या काँग्रेस ( Congress ) पक्षानं 13 आणि विशाल पाटील यांनी दिलेला पाठिंबा धरत 14 जागांवर सर्वात मोठा पक्ष बनला आहे.

लोकसभा निवडणुकीत '45 पार'चा नारा देणारी महायुती 20 जागाही पार करू शकली नाही. तर, पक्ष फुटल्यानंतरही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि शरद पवार यांनी लढा दिला. ठाकरे गटाच्या 9 तर शरद पवार यांच्या पक्षाच्या 8 जागा जिंकून आल्या.

या लोकसभेतील दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चाचपणी सुरू केली आहे. चार महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. त्याआधी निवडणुकीच्या तयारीला वेळा मिळावा म्हणून जागावाटप लवकरात लवकर पार पडावे, अशी इच्छा महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची असल्याचं सांगितलं जात आहे.

sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
Mahayuti Cabinet Expansion : मंत्रिपदाच्या 'रेस'मध्ये मराठवाड्यातील आमदाराची एन्ट्री; शिरसाट अन् गोगावलेंचा कोट खुंटीलाच टांगून राहणार?

निकष काय?

शनिवारी ( 15 जून ) शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते, पृथ्वीराज चव्हाण आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यापूर्वी तीनही पक्षांच्या नेत्यांची जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली. विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या पक्षाची किती ताकद आहे, याची चाचपणी प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवर करणार आहे.

जिथे बळ तिथेच जागा...

पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये काँग्रेसची ताकद आहे. तिथे काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी ठाकरेंच्या सेनेची ताकद आहे. तर, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बळ आहे. त्यामुळे तेथील जागा ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला मिळू शकतात.

sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
Video Ganesh Naik : राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री; पण आमच्यासाठी फडणवीसच 'लीडर'! गणेश नाईक नेमके काय म्हणाले?

सांगलीसारख्या चुका नकोत...

सांगलीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरून बरेच राजकारण तापलं होतं. ठाकरे गटानं हट्ट धरल्यानं विशाल पाटील अपक्ष लढले आणि जिंकून आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जागावाटपात सांगली मतदारसंघासारख्या झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा असेल.

कोणता पक्ष किती जागा लढविण्याची शक्यता?

काँग्रेस - 100 ते 105

शिवसेना ( ठाकरे गट ) - 90 ते 95

राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) - 80 ते 85

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com