Parth Pawar Sunil Tatkare, Praful Patel Sarkarnama
महाराष्ट्र

Parth Pawar : राज्यसभेसाठी पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर, पण नेमकी निवडणूक कोणती? पटेलांनी एक सांगितलं अन् मुंडेंनी दुसरंच...

NCP leadership decision : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काल पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Rajanand More

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील राष्ट्रीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. याच अधिवेशनात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा केली. त्यांचे नाव सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीत निश्चित झाल्याची माहितीही पटेलांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्चला निवडणूक होणार आहे. त्यासाठी पाच मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. एकूण सात जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. पटेल यांनी काल पार्थ पवार यांच्या नावाची या जागेसाठी घोषणा करताना काल पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

काल काय म्हणाले पटेल?

सुनेत्रा पवार यांचे भाषण झाल्यानंतर पटेल यांनी सांगितले की, अजितदादांनी एक कोअर कमिटी बनविली होती. काही प्रमुख नेत्यांना त्याची जबाबदारी देण्यात आली होती. काल या कोअर कमिटीने ज्यामध्ये भुजबळ, तटकरे, मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, मुंडे आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निर्णय घेतला आहे. आमच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत आम्ही हा निर्णय घेऊ इच्छित नव्हतो.

आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी, त्याची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ५ मार्च आहे, त्या जागेसाठी पक्षाने निर्णय घेतला आहे की, पार्थ पवार पक्षाचे उमेदवार असतील. पक्षाचे सर्व ४० आमदार पार्थ पवारांना निवडून देतील, असे पटेल यांनी अधिवेशनात जाहीर केले होते. आगामी निवडणुकीसाठी पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर झाल्याचे पटेलांनी स्पष्टपणे सांगितलेले असतानाही कोअर कमिटीचे सदस्य असलेल्या मुंडेंनी मात्र वेगळीच माहिती दिली.

मुंडेंच्या मनात संभ्रम?

अधिवेशनानंतर मुंडे यांनी मात्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत वेगळीच माहिती दिली. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेसाठी पार्थ यांची उमेदवारी असल्याचे विधान त्यांनी केले. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, पार्लमेंटरी बोर्डाच्या सर्व सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. वहिनींचा (सुनेत्रा पवार) जेव्हा राजीनामा होईल, तेव्हा राज्यसभेची जागा रिक्त होणार होती. सर्व सदस्यांनी एकमताने पार्थ पवारांचे नाव दिले आहे.

त्यांनी (पार्थ पवार) इच्छा व्यक्त केली नव्हती. तिथेही (दिल्ली) पाहणे आवश्यक आहे. तिथेही कामे आहेत. आज दादा नाहीत. त्यामुळे पक्षाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात मजबूत करण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डाने हा निर्णय घेतल्याचे मुंडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT