Zeeshan Siddique News : विधान परिषदेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. तब्बल 10 आमदार बिनविरोध विधान परिषदेची सदस्य बनले. त्यामध्ये भाजपचे 6, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आणि शिवसेनेचे 2 तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या 1 समावेश होता. दरम्यान, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर निवड झालेले झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी विधान परिषद सदस्याची शपथ घेतली. मात्र, यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट यांनी झिशान यांचे नाव न घेत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, काही लोकं जाणूनबुजून मराठीचा विरोध करून आम्ही कसे महाराष्ट्रद्वेषी आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही नाही बोलणार, आम्हाला वंदे मातरम नाही बोलायचं असा काही लोकांचा आग्रह आहे मला असं वाटतं, तो सगळा चुकीचा आहे. लोकं हे सर्व पाहत आहेत. निश्चित एक दिवस त्यांना त्यांची जागा पाहायला मिळेल.
इंग्रजी शपथ घेण्यावर झिशान सिद्दीकी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, मी शिक्षित तरुण आहे. इंग्रजीत शपथ घेणे ही चांगली गोष्ट आहे. मागच्या वेळी देखील घेतली होती. त्यामुळे यामध्ये जास्त विचार करण्याची गरज नाही. मला मराठी येते. पण मागच्या वेळी मी इंग्रजीत शपथ घेतली होती. ज्या प्रकारे आपण देश म्हणून पुढे जात आहोत. सर्वांनी इंग्रजीत बोलायला हवे. कोणी इंग्रजीत, कोणी हिंदीत तर कोणी मराठी शपथ घेतो. सगळ्या भाषा आपल्याच आहोत. त्यामध्ये जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही.
विधान परिषदेसाठी संधी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. अखेर नाराज माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आपण मूळघरी परत आलो असून आपल्या डीएनए शिवसैनिकाचा असल्याचे त्यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.