Pratap Jadhav Vehicle Convoy Controversy : शिवसेना मंत्री जाधवांच्या कार्यक्रमात वाहनांचा ताफा; सवाल-जवाबात पत्रकारांनाच दिला ज्ञानाचा डोस

Pratap Jadhav Gives Strong Reply During Media Interaction: एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री प्रताप जाधव यांच्या बुलढाणा इथल्या कार्यक्रमात प्रशासकीय वाहनांची लवाजमा अधिक होता.
Pratap Jadhav vehicle convoy controversy
Pratap Jadhav vehicle convoy controversySarkarnama
Published on: 
Updated on: 

Eknath Shinde Shiv Sena Buldhana News: केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांच्या कालच्या शिर्डी दौऱ्यात कार्यकर्ते 20 ते 25 वाहनांचा ताफा घेऊन शिरले असतानाच, कार्यकर्त्यांना रोखणार कोण? असा प्रतिप्रश्न आठवलेंनी केला.

आता बुलढाणा इथं एकनाथ शिंदे शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा इथल्या एका कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वाहनं समोर येताच, त्यांनी पत्रकारांना एकाच वाहनात फिरण्याचा अजब सल्ला दिला. विशेष म्हणजे, या दोन्ही मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनानंतर लगेचच मेट्रोने प्रवास केला होता.

परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन करताना, सोने खरेदी कमी, इंधन बचत, परदेशी दौरे रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. असे करण्यामागे, देशाची सेवाच आहे, असे म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला भाजप (BJP) शासित राज्यांतील मंत्री, नेते, खासदार-आमदार काहीसा प्रतिसाद देत आहे.

पण या प्रतिसादात, दिखावापणाच जास्त आहे. पंतप्रधानांनी (Narendra Modi) हे आवाहन पुढील वर्षभरासाठी केलं आहे. त्यामुळे या नेत्यांना पुढील वर्षभर साधेपणानं वागावं लागणार आहे. प्रशासकीय पातळीवर प्रतिसाद दिसत असला तरी कामकाजामुळे कितपत त्यात यश येईल, हे पुढील काळात दिसेल.

Pratap Jadhav vehicle convoy controversy
Ramdas Athawale : पंतप्रधान मोदींचा काटकसरीचा मंत्र, आठवलेंचा ताफा कार्यकर्त्यांच्या वाहनांनी 'फुल ऑन'; शिर्डीतून ‘बजाओ ताली’ म्हणत, विरोधकांना डिवचलं!

एकनाथ शिंदे शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थित बुलढाणा इथं कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाला हरताळ फासण्यात आला. मंत्री जाधव यांना याबाबत पत्रकारांना विचारणा केल्यावर, त्यांनी पत्रकारांना एकच वाहनातून फिरण्याचा सल्ला दिला.

Pratap Jadhav vehicle convoy controversy
Thalapathy Vijay : संघाच्या गडात ‘थलपती’ची एंट्री, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट?

मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, "माझा नियोजित कार्यक्रम होता. याचं उत्तर माध्यमांसमोर देणं बरोबर नाही, पण नंतर सांगेल. तुम्ही इतके पत्रकार आहेत, तर एका गाडीत फिरायला पाहिजे. बसस्टेशन सारखी गाडी उभी राहिल का, तुम्ही थांबा म्हणाल आणि याल त्यात. दिवसेंदिवस आता जागरूकता होऊ लागली आहे. एका दिवसात काही फरक पडत नसतो."

'सार्वजनिक ठिकाणी वावरताना, मंत्र्यांचा एक प्रोटोकाॅल असतो. पण मी पोलिस अधीक्षकांना फोन करून, माझ्या ताफ्यातील संरक्षणाच्या गाड्या कमी करू टाका, अशा सूचना दिल्या आहेत,' असेही मंत्री जाधव यांनी म्हटले.

पंतप्रधानाच्या आवाहनानंतर मंत्री जाधव हे दिल्लीत मेट्रोने प्रवास करत होते. पण बुलढाणा इथल्या कार्यक्रमात वाहनांचा ताफा टाळता आला असता किंवा कमी करता आला असता, हा प्रश्न मंत्री जाधवांच्या चांगलाच जिव्हारी लागला. यातून पत्रकारांनाच त्यांनी एकाच वाहनातून फिरण्याचा सल्ला दिला. मंत्री जाधव अन् पत्रकारांमधील सवाल-जवाबची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court
Prataprao Jadhav Vidyadhar Mahale
parbhani municipal corporation; uddhav thackeray and DCM eknath shinde
Eknath Shinde
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com