Nitin Gadkari Sarkarnama
महाराष्ट्र

Nitin Gadkari News : ...म्हणून नितीन गडकरी भाजपच्या पुण्यातील अधिवेशनाला होते अनुपस्थित!

Mayur Ratnaparkhe

Nitin Gadkari and Maharashtra BJP Convention : पुण्यात आज(रविवारी) भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पार पडले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला बसलेल्या फटक्यानंतर झालेल्या या अधिवेशनास चिंतन अधिवेशन असंच संबोधलं गेलं होतं. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात पार पडलेल्या या अधिवेशनास गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच महाराष्ट्र भाजपचे सर्व आजीमाजी आमदार, खासदार, मंत्री अन् नेते, पदाधिकारीही हजर होते. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अनुपस्थित होते. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, शिवाय गडकरी का गैरहजर हे जाणून घेण्याची उत्सुकताही भाजपच्या(BJP) कार्यकर्त्यासह अनेकांना होती.

अखेर नितीन गडकरी(Nitin Gadkari) या महत्त्वपूर्ण अधिवेशनास अनुपस्थित राहण्याचं कारण समोर आलं आहे. नितीन गडकरी यांनी स्वत: ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने अधिवेशनास हजर राहता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

'पुणे येथे आयोजित भाजपा महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे आज उपस्थित राहू शकणार नाही. याबद्दल सर्व कार्यकर्त्यांप्रती दिलगिरी व्यक्त करत आहे. अधिवेशनासाठी आज उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन आपण नव्या उर्जेने पक्षाच्या मजबुतीसाठी कार्य कराल, हा विश्वास आहे.' असं ट्वीट करत गडकरींनी माहिती दिल्याचे समोर आले आहे.

दरम्यान,भाजपच्या अधिवेशनात गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन तर केलेच, शिवाय राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागण्याच्या सूचनाही केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT