MLA Bacchu Kadu News Sarkarnama
महाराष्ट्र

MLA Bacchu Kadu On BJP : पश्चाताप नाही; पण भाजपच्या दुटप्पी धोरणाचा निषेधच...

Maharashtra Political News : सत्तेत सहभागी होता येत नसेल, तर महायुतीत सहभागी होण्याचा काय उपयोग?

Prasad Shivaji Joshi

Hingoli Political News : मैत्री भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यासारखी असावी, जियेंगे साथ और मरेंगे भी साथ में. मात्र, भाजपचे मित्र पक्षांशी असणारे धोरण दुटप्पी आहे. (Maharashtra Political News) त्यांच्या या धोरणाचा मी निषेध करतो, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मनातील खदखद `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केली.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले तेव्हा त्यांना शिवसेनेच्या आमदारांसोबतच अपक्षांचीही साथ मिळाली. आमची कामे होत नाहीत, या एका मुद्द्यावर अनेक अपक्ष मोठ्या अपेक्षेने (BJP) भाजप सरकारमध्ये सहभागी झाले होते, पण सध्या त्यांचा चांगलाच अपेक्षाभंग झाला आहे. यापैकीच एक म्हणजे प्रहारचे आक्रमक (Bachhu Kadu) आमदार बच्चू कडू.

गेल्या काही दिवसांपासून बच्चू यांच्या `कडू` बोलामुळे भाजप व्यथित आहे. बच्चू कडू आज हिंगोलीत (Hingoli) आले असताना त्यांनी विविध विषयांवर आपली परखड मते मांडली. महायुतीसोबत असल्याचा पश्चाताप होतोय का ? यावर बच्चू कडू भरभरून बोलले. पश्चातापाची भावना नाही. मात्र, भाजपची मैत्री ही अफझलखानासारखी वाटते.

आम्ही मित्र म्हणून सोबत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्या मतदारसंघात येऊन खासदार अनिल बोंडेंना मतदारसंघ ताब्यात घ्यायचा आहे, असे सांगितले. हे चुकीचे आहे, वास्तविक भाजपने कितीही खासदार आणले तरी आम्हाला फार काही फरक पडत नाही, जनता आमच्यासोबत आहे. मात्र, एकदा मित्र म्हणून स्वीकार केला असताना दुटप्पी वागणूक देणे योग्य नाही.

भाजप मित्र पक्षांना देत असलेल्या वागणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा झाली आहे का? या प्रश्नावर अद्याप यासंदर्भात आपले कोणाशीही बोलणे झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील वाटचालीविषयी सद्यःस्थितीत तरी आपण कुठलाही निर्णय घेतलेला नाही. भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांना दुटप्पीपणाने वागणूक देतो, असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून नेहमीच केला जातो.

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेनेही पक्षाची साथ सोडली. रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनीही नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी नुकतेच स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत. याकडे लक्ष वेधले असता भाजपची प्रतिमा मलिन होत आहे यात शंकाच नाही, असे कडू म्हणाले.

पक्षाचे कार्यकर्ते व विशेषतः मित्र पक्षातील नेतेमंडळींना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाला महामंडळाचा आधार असतो. मात्र, पक्ष फोडाफोडी, आमदार अपात्रता प्रकरण व महायुतीत सहभागी असलेल्या तीन पक्षांच्या नेत्यांना सहभागी करून घेताना संभाव्य नाराजीची धास्ती त्यांना आहे. यामुळे मित्र पक्षांना अद्याप कुठेही सत्तेत वाटा मिळालेला नाही. परिणामी सत्तेत सहभागी होता येत नसेल, तर महायुतीत सहभागी होण्याचा काय उपयोग? अशी भावना भाजपच्या मित्र पक्षांमध्ये बळावल्याची कबुलीही बच्चू कडू यांनी यावेळी दिली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT