OBC Vs Maratha Sarkarnama
महाराष्ट्र

OBC Vs Maratha: मराठा आरक्षणानंतर ओबीसी संघटना एकवटल्या; दोन स्तरावर लढणार लढाई, प्लॅन तयार!

Maratha Reservation OBC: हैदराबाद गॅझेटसंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरनंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणी दोन स्तरावर लढाई लढण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे.

Roshan More

OBC Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर हैद्राबाद गॅझेट लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी संघटनांनी मराठ्यांच्या ओबीसीत समावेश होत असल्याचा आक्षेप घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाने ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून आम्ही दोन स्तरावर ही लढाई लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

विदर्भातील ओबीसी नेत्यांच्या 12 सप्टेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात व्यूहरचना निश्चित होईल, मात्र, दोन स्तरांवर ही लढाई लढणार असल्याचे ओबीसी नेते सांगत आहेत. वकील पूर्ण ताकदीने न्यायालयात आपली बाजू मांडतील. तर, दुसरा लढा हा आंदोलनाच्या माध्यमातून असणार आहे.

आज (सोमवार) मुंबईत ओबीसी नेत्यांच्या बैठक यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये होणार आहे. या बैठकीत देखील हैद्रबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर चर्चा होणार आहे. तसेच पुढील लढाईची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

हाकेंची संघर्ष यात्रा

लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये मोर्चा काढून सरकारच्या जीआरला विरोध केला होता. त्यांनी बीडमधील गेवराई येथे सभा घेत ज्या आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला त्यांच्यावर टीका केली. हाके यांनी ओबीसींच्या जागृतीसाठी तसेच ओबीसीमध्ये मराठा समाजाची होत असलेल्या घुसखोरी विरोधात संघर्ष यात्रा राज्यभर काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

ऑक्टोबरमध्ये महामोर्चा

ओबीसी नेत्यांची नागपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीला विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, सरकारने जीआरमधील पात्र शब्द वगळल्याने मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार असा त्याचा अर्थ होतो. हा मूळ ओबीसींवर अन्याय आहे. याविरोधात आम्ही लढा देणार असून ऑक्टोबरमध्ये नागपूरात ओबीसींचा महामोर्चा निघेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT