Ulhasnagar Political News : ठाकरे बंधू एकत्र येत असताना एकनाथ शिंदेंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेत देखील ठाकरे बंधुंची जादू चालेल अशी चर्चा आहे.
मात्र, एकनाथ शिंदे हे देखील अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी ठाकरे बंधूंना रोखण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच उल्हासनगर महापालिकेत ताकद असलेल्या टीम ओमी कलानी गटाने शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात 'दोस्ती का गठबंधन' जाहीर करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली. यावेळी टीम ओमी कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी आणि त्यांच्या सदस्यांना पेढा भरवत आनंद व्यक्त करण्यात आला.
आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानीचा तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी ओमी कलानी यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी निवडणुका शिवसेना समवेत एकत्रित लढण्याची इच्छा ही यावेळी ओमी कलानी यांनी व्यक्त केली.
उल्हासनगर महापालिकेत कलानी कुटुंबाचे वर्चस्व आहे. सत्तेत असो वा नसो प्रत्येक प्रभागात कलानी कुटुंबाचे समर्थक आहेत. त्यामुळे राज्यात सत्ता असणाऱ्या किंवा विरोधात असलेल्या पक्षाला उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाची मदत घ्यावी लागते. उल्हासनगरचे विद्यमान आमदार हे भाजपचे कुमार आयलानी आहेत. त्यांच्याविरोधात पप्पू कलानी हे विधानसभेच्या वेळी सक्रीय झाले होते. कलानी कुटुंबाने लोकसभेला श्रीकांत शिंदे यांना पाठींबा दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.