Laxman Hake Sambhaji Raje sarkarnama
महाराष्ट्र

Laxman Hake : संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके भडकले

Maratha Reservation Laxman Hake Sambhaji Raje : संभाजी भोसले तुम्हाला राजे का म्हणायचे? जर तुम्ही शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे वारस असता तर तुम्ही महिलांच्या, भटक्यांच्या, ओबीसींच्या आंदोलनाला भेट दिली असती, असे हाके म्हणाले.

Roshan More

Laxman Hake News: मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. आज (सोमवारी) मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषस्थळी संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली. या भेटीमुळे उपोषणला बसलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा एकेरी उल्लेख करत टार्गेट केले.

लक्ष्मण हाके म्हणाले, संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. मिस्टर संभाजी भोसले आम्ही तुम्हाला राजा मानत नाही. तु्म्ही शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे वैचारिक वारस नाही. आम्ही त्यांचे वैचारिक वारस आहोत.

संभाजी भोसले तुम्हाला राजे का म्हणायचे? जर तुम्ही शिवाजी महाराजांचे, शाहु महाराजांचे वारस असता तर तुम्ही महिलांच्या, भटक्यांच्या, ओबीसींच्या आंदोलनाला भेट दिली असती. आता राजा राणीच्या घरी राजा जन्मालायेत नाही. मतमेटीतून राजा जन्माला येतो, असा टोला देखील लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजेंना लगावला.

आम्ही तुम्हाला राजा माननार नाही. तुमच्या वडिलांना आम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारस मानतो. जरांगे पाटील, जरांगे पाटलांचा बाप, संभाजीराजे काय? कोणीही येवूद्या महामानव संविधानची चौकट पूर्ण केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. एक तर मागासवर्गीय समाजात जन्माला यावं लागतं नाहीतर मागसवर्गाच्या ठरवून दिलेल्या अटी पूर्ण कराव्या लागतात, असे हाके म्हणाले.

जरांगेंचे आंदोलन शोषित वंचितांचे नाही. संभाजीराजेंची देखील शोषित वंचितांचा कळवळा नाही. राजकारणाठी ते त्यांना येऊन भेटले. ओबीसी आंदोलन असंवैधानिक बीडमध्ये, मराठवाड्यात दुकानावर हल्ले झाले, धनगर समजाच्या व्यक्तीला नाक घसायला लावले त्याचे व्हिडिओ काढले. तेव्हा तुम्ही का नाही आले असा सवाल देखील हाके यांनी संभाजीराजेंना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT