Mumbai News : माजी मंत्री एकनाथ खडसे यांना त्यांच्यापेक्षा मतदारसंघात इतर कोणी मोठे झालेले आवडत नाही. काही मिळाले तर ते माझ्यामुळे मिळाले. मी त्याला मोठे केले. मी पुढे आणले, असे नेहमीच ते इतरांच्या बाबतीत बोलत असतात. त्याशिवाय मुख्यमंत्री पदावरील व्यक्तींना मीच शिकवले, मीच त्यांना सांगितले, केवळ मी, मी म्हणत असल्याने त्यांच्यात अंहभाव आला आहे. अशास्वरूपाचा अंहकार त्यांच्याकडे आहे. त्यामुळे येत्या काळात खरच त्यांना प्रगती करायची असेल तर खडसे यांनी त्यांच्यातील अंहभाव बाजूला ठेवावा लागेल, असा सल्ला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अनेक गौप्यस्फोट करीत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांनी केलेल्या सर्व आरोपातील हवाच काढली. त्यांना मीच मुख्यमंत्री आहे. त्यांना काय कळते यांना काय कळते, असे म्हणत त्यांचा बराच वेळ इतरांची खिल्ली उडविण्यात जात असतो. राजकारणात केवळ त्यांना स्वतःचे कुटुंब दिसते. त्यासोबतच पक्षाचे नेते मोठे व्हावे, असे त्यांना कधीच वाटत नाही. भाजप सोडून गेलेल्या नेत्यामुळे भाजपचे काहीच नुकसान झाले नाही.
ज्यावेळी कोणी जर सर्वकाही केवळ मी आणि मीच म्हणतो. ज्याच्या जवळ असा अहंकार येतो, त्यावेळेस त्याचा अंतजवळ आलेला असतो. त्यांच्या स्वभावात असलेला मी पणा त्यांना घेऊन बुडाला आहे. सहा टर्म गिरीश महाजन माझ्यामुळे निवडून आला, असे सांगत होते. पण मतदारांना मी केलेले काम माहित आहे. इतर सर्वजण चुकीचे ही त्यांची अहंकाराची भूमिका त्यांनी सोडली तर निश्चितच त्यांना येत्या काळात परत एकदा राजकारणात यशस्वी होता येईल, असा मौलिक सल्ला त्यांना या मुलाखती दरम्यान महाजन यांनी दिला.
जळगाव जिल्ह्यावर त्यांना एक छत्री अंमल हवा आहे. कोणीच त्यांच्या पुढे गेला नाही पहिजे, असे त्यांना वाटते. तीन-चार टर्म आमदार झालेल्या आमच्या पक्षातील काही नेत्यांची त्यांनी उमेदवारी कापली. या ठिकाणी परत पक्षाचा आमदार निवडून आला नाही. माझ्याशिवाय या ठिकाणी कोणी मोठा नाही. जळगाव जिल्हा म्हटले की फक्त एकनाथ खडसेंचे (Eknath Khadse) नाव घेतले पाहिजे. मात्र, आम्ही त्यांनी कधी विरोध केला नाही फक्त आम्ही आमची लाईन मोठी करीत गेलो. त्यांच्यापेक्षा आमची लाइन मोठी झाली. माझे नाव घेतले की खडसे आजही प्रचंड अस्वसथ होतात.
खडसेंचे सध्या काय चाललय हेच मुळात समजत नाही. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, असे सांगतात. लोकसभा निवडणुकीवेळी ते म्हणाले, मी सुनबाई रक्षा खडसे यांच्यासाठी भाजपचा प्रचार केला. त्यांना निवडून आणले व केंद्रात मंत्री केले, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे शरद पवार म्हणतात नाथाभाऊ आमच्या पक्षाचे आमदार आहेत. तुमची आमदारकी कोण काढणार नाही, असे ते म्हणतात. त्यामुळे नेमके त्यांचे काय चाललंय हेच समजत नाही. राजकारणात असे काही होत असते का ? असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
खडसे यांनी पक्ष प्रवेश जे. पी. नड्डा यांच्या उपस्थित केला असे सांगत आहेत. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला असेल तर मी अथवा देवेंद्र फडणवीस त्यांना रोखू कसे शकतो ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी त्यांच्या बाबतीत पक्षातील ज्येष्ठ नेत्याना एकही शब्दही सांगितला नाही अथवा त्यांच्या प्रवेशाला विरोध केला नाही.
खडसे यांनी पक्ष सोडण्यासाठी कारणीभूत तेच आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या सॊबतचा वाद ओढवून घेतला. त्यांच्या विषयी त्यांनी घाणेरडे वक्तव्य केले. दुसरे म्हणजे भोसरीतील भूखंड प्रकरणी ते महसूलमंत्री असूनही ते अडचणीत सापडले. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला आहे. त्यासाठी आता आमची नावे घेऊन काहीच फायदा नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
अडीच वर्षाच्या काळात एकनाथ खडसे यांनी खूप त्रास दिला त्यांनी माझ्यावर मोक्का लावण्याचा प्रयत्न केला. जवळच्या मित्राना सात ते आठ महिने त्रास दिला. पोलिसांकडून त्यांना सतत त्रास देत होते. मला जर पेन ड्राईव्ह मिळाला नसता तर मी पण कधीच जेलमध्ये गेलो असतो. महाजन संपला की देवेंद्र फडणवीस संपला अन हे दोघेही संपले की भाजप संपेल, असे षड्यंत्र त्यांनी रचले होते. त्यामुळे येत्या काळात आम्ही दोघे एकत्र येऊ असे वाटत नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
खडसे यांनी त्यांच्याकडे असलेला अंहकार, उर्मटपणा येत्या काळात सोडला पाहिजे. कार्यकर्ते व नेतेमंडळीत मिळून मिसळून वागले पाहिजे, त्याचा निश्चितच येत्या काळात फायदा होईल, असे वाटते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.