Omraje Nimbalkar   Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस की भाजपचे केंद्रीय मंत्री, कोण खोट बोलते? त्यांनीच सांगावे : ओम राजेनिंबाळकरांचे थेट सवाल

Fadnavis lying allegation News : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील मदतीबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी मोठी माहिती दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील मदतीबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मोठी माहिती दिली आहे. अतिवृष्टीनंतर राज्य सरकरने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नाही, अशी माहिती केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांनी लेखी उत्तरात लोकसभेत दिली. त्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री यांनी केलेला दावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडताना केंद्र सरकारला मदत अहवाल पाठवल्याचे स्पष्ट केले आहे. यावर बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मोठा सवाल उपस्थित केला आहे. एकतर मुख्यमंत्री फडणवीस खोट बोलत असावे नाहीतर केंद्रीय गृह राज्यमंत्री राय खोटे बोलत असावेत, असा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केला आहे.

राज्यातील अतिवृष्टीच्या मदतीबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्तावच पाठवला राज्यातील अतिवृष्टीच्या मदतीबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्तावच पाठवला नसल्याचे उघड झाले आहे. या नुकसानीची मदत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मिळावी, यासाठी केंद्राकडे प्रस्तावच पाठवण्यात आला नाही. लोकसभेतील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या तारांकित प्रश्नाला केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा ढिसाळ कारभार चव्हाटयावर आला आहे.

खासदार राजे निंबाळकर यांच्या लेखी प्रश्नावर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी 2 डिसेंबरला संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. सोबतच अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही सरकारची गंभीर चूक असल्याचे दिसून आले आहे. 14 लाख हेक्टरवर नुकसान झाले असताना केंद्राला मात्र 1.10 लाख हेक्टरचाच आकडा देण्यात आला आहे. राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्राने 3 हजार 132.80 कोटी दिले असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता विरोधकांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.

राज्यभरात अतिवृष्टीमुळे 75.42 लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान, तर 3598 घरांचा नुकसान झाले आहे. महापुराच्या विळख्यात 224 जणांचा मृत्यू, तर 599 जनावर मृत्युमुखी पडल्याची लेखी उत्तरात माहिती आहे. दरम्यान याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर माहिती देताना म्हणाले की, केंद्रीय सरकारनेच स्पष्टपणे या बाबत माहिती दिली आहे.

राज्य सरकारने प्रस्तववेळेत दिला असता तर तात्काळ मदत मिळण्यास मोठी मदत झाली असती. मी देखील प्रचारात व्यस्त होतो. मात्र मी माझा पंचातारीक प्रश्न विचारायला विसरलो नाही. त्यामुळे बाकी मंत्र्यानी प्रचारातून वेळ काढून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.

राज्यभरात अतिवृष्टीमुळे 75.42 लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान, तर 3598 घरांचा नुकसान झाले आहे. महापुराच्या विळख्यात 224 जणांचा मृत्यू, तर 599 जनावर मृत्युमुखी पडल्याची लेखी उत्तरात माहिती आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर, उद्धवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि खासदार संजय देशमुख यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. गृह मंत्रालयाने अतिवृष्टी नुकसान पाहणीसाठी 16 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय मंत्र्यांचे पथक नेमले होते. 1,13,455 शेतकऱ्यांना 82 कोटी 37 लाख 50 हजार 48 रुपयांची मदत करण्यात आली आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री रॉय म्हणाले.

दुसरीकडे, राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागासाठी केंद्राकडे मदतीचा राज्य सरकारचा प्रस्ताव आधीच गेलेला असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांनी दिली आहे. राज्य सरकारकडून प्रस्ताव गेल्यानंतरच केंद्राच्या चमूने पाहणी केलीय. केंद्राकडे दोन प्रस्ताव असून ज्यात एक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहे. तर दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीसंदर्भात असल्याचीही माहिती मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांनी दिली. पहिला शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे आधीच गेला असल्याचे सरकारकडून आता स्पष्टीकरण देण्यात आले तर दुसरा प्रस्ताव पायाभूत सुविधा नुकसानीसंदर्भातला असून ज्यावर उद्या दिल्लीत बैठक पार पडणार असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.

/////////////

नवी मुंबईतील शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याचा ठाकरे सेनेत प्रवेश

महापालिका निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडी

ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईतही शिंदे सेनाला उद्धव सेनेने खिंडार पाडले आहेत. जिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे सेनेला जेरीस आणण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT