NCP Sharad Pawar : पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 'नो इंटरेस्ट'; 'तुतारी'वाला माणूस मतपत्रिकेवरून गायब?

Pune Local Body Elections : पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन खासदार आहेत. त्यामुळे या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अधिक ताकतीने पक्ष उतरेल अशी अपेक्षा होती. मात्र खासदार अमोल कोल्हे यांच्या भागातून फक्त शिरूर वगळता इतर कुठेही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाच पाहायला मिळत नाही.
Sharad Pawar
Supporters gather outside a municipal election campaign venue in Pune as key parties intensify their strategies. The scene highlights shifting political dynamics in the Pune municipal elections.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 30 Nov : पुणे जिल्ह्यातील १४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायती आशा एकूण १७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका सध्या सुरू आहेत. या निवडणुकांमध्ये एकीकडे भाजप आपली वाढवलेली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र या सर्व रण संग्रामामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मात्र काहीसा अलिप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. एक दोन ठिकाणं सोडता हा पक्ष कुठेही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेला पाहायला मिळत नाही. पुणे जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.

शरद पवारांनी आपल्या राजकारणाच्या सुरुवातीपासूनच पुणे जिल्ह्यामध्ये अत्यंत भक्कमपणे संघटनेची बांधणी केली आहे. कुठेतरी ही संघटनात्मक बांधणी डळमळीत झाली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यातील 14 नगरपालिकेचा विचार केल्यास शिरूर, बारामती आणि सासवड नगरपालिका वगळता इतर अकरा नगरपालिकांमध्ये तुतारीच्या चिन्हावर लढवणारा एकही नगराध्यक्षपदाचा उमेदवार पाहायला मिळत नाही.

Sharad Pawar
Malshiras Politics : 'विधानसभेला राम सातपुतेंचं काम करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, थेट फडणवीसांसोबत मिटिंग...', मोहिते पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट

या ठिकाणीही शरद पवारांचा पक्ष विरोधकांना कडवी झुंज देताना दिसत नाही. तसेच लोणावळा, मंचर आणि जुन्नर सारख्या नगरपरिषदांमध्ये काही ठराविक प्रभागांमध्ये उमेदवार पक्षाकडून देण्यात आले आहेत. हे ठराविक ठिकाणं सोडता इतर ठिकाणी पक्षाने उमेदवार देण्याचीही तस्ती घेतल्याचं पाहायला मिळत नाही.

Sharad Pawar
Dhananjay Munde : 'ही निवडणूक खूप महत्त्वाची, काहीजण माझं राजकारण नव्हे तर मलाच...'; धनंजय मुंडेंचं परळीकरांना भावनिक आवाहन

खासदारांच्या भागातही उमेदवार नाही

विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन खासदार आहेत. त्यामुळे या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अधिक ताकतीने पक्ष उतरेल अशी अपेक्षा होती. मात्र खासदार अमोल कोल्हे यांच्या भागातून फक्त शिरूर वगळता इतर कुठेही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाच पाहायला मिळत नाही.

तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघातून बारामती आणि सासवड व इतर ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्यात आलेला नाही. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये भाजप, अजित पवारांचा राष्ट्रवादी, शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारात आपल्या नेत्यांची फौज उतरवलेली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील सक्रियपणे प्रचारात उतरून प्रचार सभा घेताना पाहायला.

मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणतेही दिग्गज नेते अद्याप पुणे जिल्ह्यामध्ये प्रचारामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत नाही. खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे हे देखील त्या प्रमाणात प्रचारसभा अथवा दौरे करताना पाहायला मिळत नाही. यामुळे पुणे जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाला इंटरेस्ट नाहीये का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पक्षाच्या या भूमिकेमुळे मतपत्रिकेवरून कुठेतरी तुतारी वाजवणारा माणूस गायब झाल्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com