Shiv Sena UBT Crisis : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे अन्य पाच खासदारांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ओमराजे यांच्याकडून समर्थकांशी चर्चेनंतर रविवारी किंवा सोमवारी त्यांच्या निर्णयाबाबत घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्याआधी त्यांच्या मनातील खदखद रविवारी पहिल्यांदाचा समोर बाहेर आली.
ओमराजे रविवारी पुण्यातून धाराशिवकडे रवाना झाले. आज मी माझ्या कार्यकर्त्यांना चार वाजताची वेळ दिली आहे. गोवर्धनवाडी याठिकाणी मी सर्वांना बोलविले आहे. त्यांच्याशी चर्चा करून मी माझा निर्णय जाहीर करेन, असे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. तसेच त्यांच्या मनातील खदखदही रविवारी पहिल्यांचा बाहेर आली. ते ठाकरेंना सोडून जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यावरूनही त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
खरंच इतका वाईट आहे का?
मीडियाशी बोलताना ओमराजे म्हणाले, मी चार दिवसांपासून ऐकतोय. मी निर्णय जाहीर केला नाही. पण माझ्या अख्या कुटुंबाचा उध्दार काही लोक करत आहेत. त्यांचा काहीही संबंध नाही. ओमराजे ज्याच्या कामाला पडलाय, ज्याच्यासाठी झटलाय, ज्याला ओमराजे त्याच्या घरातला माणूस वाटतोय, तो माणूस त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा अशापध्दतीने उध्दार करेल, असं मला वाटत नाही. पण काही लोकांनी केला.
मी तेही सहन केलं. या राजकीय प्रक्रियेत माझ्या कुटुंबाने तुमचं काय वाटोळं केलंय. माझ्या नुसत्या चर्चेनं मी तीन दिवसांत इतका वाईट होत असेल, तर खरंच इतका वाईट आहे का मी? रीलस्टार म्हणून माझी हिनवणी केली जातेय. रीलस्टार असलेल्या माणसाला लोकं मतं टाकतात का?, असे सवाल करत ओमराजेंनी मागील चार दिवसांतील घडामोडींवर भाष्य केले.
हेटाळणी का झाली?
ओमराजे म्हणाले, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाबद्दल एक शब्दही अवाक्षर जाणार नाही, गेलेलं नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत लोकं पाठीशी राहिली. पैशांची ताकद असतानाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझ्या मतदारसंघात एवढ्या पंचायत समित्या, नगरपालिका आहेत, त्या सगळ्या ठिकाणी माझी एकही पंचायत समिती, नगरपालिका निवडून येऊ शकली नाही. खरंच आम्ही इतके वाईट आहे का?
मी, आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी, सोपल साहेब आम्ही चोवीस तास लोकांना देतो. आम्ही त्यांच्या काम करतो. अशा परिस्थितीत मशाल या चिन्हावर उभे राहिलेल्या उमेदवारांना पराभवाचे तोंड का बघावे लागले आणि इतकं वाईट. चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असताना उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर जातो. मला याच गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. शेवटी लोकं आमच्या कामावरच मते टाकणार होते. मग आमची आणि आमच्या कार्यकर्त्यांची हेटाळणी का झाली. हा माझ्या मनाला प्रश्न आहे. त्या लाखो निष्ठावंतांना प्रश्न आहे. माझा माणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला नव्हता. असे असताना पराभव झाला. मला त्याचा शोध घ्यायचाय, असे ओमराजे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.