Omraje Nimbalkar News : सहा खासदारांसोबत स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतलेल्या ओमराजे निंबाळकर यांची भूमिका पुढे आली आहे. त्यांची गोवर्धनवाडी येथे बैठक सुरू आहे. या बैठकीत त्यांनी आपल्याला सत्तेतील नेतृत्व स्वीकारावे लागेल, असे वक्तव्य केले. त्यानंतर आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते जाणार असल्याचे घोषीत केले.
ठाकरेंच्या सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर त्यातील ओमराजे यांनी आपली भूमिका अजून ठरली नसल्याचे सांगितले होते. आपण गावी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.
उद्धव ठाकरे यांनी देखील ओमराजेंशी फोनद्वारे संवाद साधला होता. या संवादातून ओमराजे यांनी आपण मातोश्रीवर येऊन भेटू असे सांगितले होते. त्यामुळे ते निर्णय फिरवतील असे वाटत होते. मात्र, आज पुण्याहून ते धाराशिवमधील आपल्या गोवर्धवाडी या आपल्या गावी गेले. तेथे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या बैठकीत ओमराजेंनी आपल्याला सत्तेतील नेत्यासोबत राहावे लागेल, असे वक्तव्य केले. त्यामुळे ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जातील, असे सांगितले जात आहे. त्या प्रमाणे त्यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची घोषणा केली.
ओमराजे यांचे आधीच ठरले होते. मात्र, त्यांनी ते आत्ता सांगितले, असे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही कोणतही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, असे वक्तव्य केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.