

Dharashiv, 21 June : खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या गोवर्धनवाडीतील कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना दुसरीकडे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे मूळगाव असलेल्या तेरमधील शिवसैनिकांनी भूमिका मांडली आहे. जिथं आहे, तिथं थांबा, तरीही निर्णय घेतल्यास तुम्हाला शुभेच्छा आम्ही उद्धवसाहेबांसोबतच राहणार, अशी भूमिका काही शिवसैनिकांनी मांडली, तर काहींनी अशा परिस्थितीत ओमराजेंना एकटं सोडून जमायचं नाही, असेही काही शिवसैनिकांनी म्हटलं आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बैठकीपूर्वी तेर येथील शिवसैनिकांनी ही भूमिका मांडली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहावं, असं आम्हाला वाटतंय. जिथं आहे, तिथंच राहायला पाहिजे, अशी भूमिका एका कार्यकर्त्याने मांडली.
ओमराजेंनी शिंदेसेनेत गेलं नाही पाहिजे. जिथं आहे, तिथंच त्यांनी राहिलं पाहिजे. ४० वर्षांत असा काय विकास झाला आहे. विकासाच्या नावावर तरी कोणी जातोय, असं म्हणायचं नाही. धाराशिव जिल्ह्याला गेल्या ४० वर्षांत काय मिळालं नाही, कोणतं मोठं पद मिळायचंं राहिलं आहे? पण, धाराशिवचा काय विकास झाला?, देशातील पहिल्या १० मागास जिल्ह्यांत धाराशिवचा नंबर लागतो. विकास म्हणजे काय? विकासाची व्याख्या काय? विकास तर अजूनपर्यंत कोणालाही बघायला मिळालेला नाही, या शब्दांत ओमराजेंच्या भूमिकेवर टीकाही शिवसैनिकाने केली.
जिथं आहात, तिथंच थांबा, अशी विनंती आम्ही बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांना करणार आहोत. जरी तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला शुभेच्छा. आम्ही शेवटपर्यंत उद्धवसाहेबांसोबत राहणार आहोत. आम्ही ओमराजेंसोबत जाणार नाही, आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार आहोत, असेही एका शिवसैनिकाने स्पष्ट केले.
निष्ठावंत खासदार म्हणून ओमराजेंनी उद्धव ठाकरेंसोबतच राहिलं पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाऊ नका, अशी विनंती आम्ही करणार आहोत. त्यानंतरही त्यांनी निर्णय घेतला तर त्यांना आमच्या शुभेच्छा, आम्ही मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहोत, अशी भूमिका गोवर्धनवाडीतील शिवसैनिकांनी मांडली.
निष्ठा घेऊन निवडणुकीला पुढे जायचं का?
सध्याच्या काळात ओमराजांना एकटं सोडणं जमणार नाही. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. पण गावातील ज्येष्ठांना विचारून आम्ही निर्णय घेणार आहोत. पडत्या काळात ओमराजेंना एकटं सोडून जमायचं नाही. ते जिकडं जातील, त्यांच्यासोबत आपण जायचं. त्यांना मंत्रिपद नाही मिळालं तरी चालेल. पण पहिल्या ठिकाणी तरी काय आहे? असा सवालही त्यांनी विचारला.
निष्ठा घेऊन निवडणुकीला पुढे जायचं का? विकास कामांसाठी निधीच लागणार आहे. बैठकीत मी ओमराजेंना शिवसेनेत प्रवेश करा, असं सांगणार आहे, अशी भूमिका दुसऱ्या शिवसैनिकाने मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.