Pahalgam martyrs’ families express support for the Indian Army’s Operation Sindoor air strike on Pakistan. sarkarnama
महाराष्ट्र

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर योग्य नाव! पहलगाम शहीदांच्या कुटुंबांचा एअर स्ट्राईकला पाठिंबा

Airstrike After Pahalgam Attack : डोंबिवलीतील पहलगाम हल्ल्याती शहीद संजय लेले यांचा पुत्र हर्षल याने या कारवाई विषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, बाबांच्या आत्माला आता शांती मिळाली असेल.

Roshan More

Pahalgam Martyrs Family Support: मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकव्यात काश्मीरमध्ये घूसून 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केले. यामध्ये दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले तसेच 80 ते 90 दहशतवादी मारल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला या एअर स्ट्राईकमधून घेतल्याची भावाना पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबाची आहे.

पुण्यातील पहलगाम हल्यातील शहीद कौस्तुभ गनबोटे यांच्या कुटुंबाने या कारवाई स्वागत करत म्हटले की, दहशतवाद्यांना असेच शोधून शोधून संपवायला पाहिजे. त्यांनी पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही पाहिजे. या ऑपरेशनला जे सिंदूर नाव देण्यात आले ते अतिशय योग्य आहे. ज्या महिलांनी आपल्या पतीला गमावले त्यांना या ऑपरेशनमधून न्याय मिळाला.

डोंबिवलीतील पहलगाम हल्ल्याती शहीद संजय लेले यांचा पुत्र हर्षल याने या कारवाई विषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, बाबांच्या आत्माला आता शांती मिळाली असेल. मिशन सिंदूर राबवून बदला घेण्यात आला आम्ही त्याचं स्वागत करतो. या कारवाईने आम्हाला आनंद झाला आहे.

ऑपरेशन सिंदूर नावासाठी आभारी...

पुण्यातील जगदाळे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या भावना समजून घेतल्या. ज्यांनी भारतीय स्त्रियांचे कुंक पुसले त्या ददशवाद्यांना गोळ्या घालण्यात आल्या. या ऑपरेशनला जे सिंदूर नाव देण्यात आले त्याचे आम्ही स्वागत करतो आणि ऑपरेशन सिंदूर नाव दिल्याबदद्ल आभार व्यक्त करतो.

ऑपरेशन सिंदूर का दिले नाव?

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घूसून केलेल्या कारवाईला सिंदूर नाव देण्यामागे भावनिक कारण असल्याचे दिसते आहे.दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यात महिलांच्या समोर त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या. महिलांना टार्गेट करण्यात आले. महिलांचे सौभाग्य त्यांच्या डोळ्यासमोरच उजाडण्यात आले. सौभाग्याच्या प्रतीक सिंदूर म्हणूनच या ऑपरेशनला सिंदूर हे नाव देण्यामागचा विचार असावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT