Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Operation Tiger : एकनाथ शिंदें मोठा धमाका, उद्धव ठाकरेंचे 8 खासदार फुटणार? रात्रीची बैठक अन्...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंनी ठाण्यात गुप्त बैठक घेतली या बैठकीला उद्धव ठाकरेंचे आठ खासदार उपस्थित असल्याची चर्चा आहे. शिंदेंनी ऑपरेशन टायगर अ‍ॅक्टिव्ह करत ठाकरेंना धक्का देण्याची तयारी केली आहे.

Roshan More

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा धमाका करण्याच्या तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. उद्धव ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदार एकनाथ शिंदे फोडणार असल्याचे वृत्त 'साम टिव्ही' या मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे. बुधवारी रात्री शिंदेंनी ठाण्यात गुप्त बैठक घेतली. या बैठकीला ठाकरेंचे आठ खासदार देखील उपस्थित असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी गेले आहेत. गावाला जाण्यापूर्वी त्यांनी ठाण्यात गु्प्त बैठक घेत ऑपरेशन टायगर अ‍ॅक्टिव्ह केले. या बैठकीत सहा खासदार प्रत्यक्ष तर दोन खासदार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

मुंबईतील संजय दिना पाटील, अरविंद सावंत यांच्यासह संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, राजाराम वाकचौरे, ओम राजेनिंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव हे खासदार बैठकीला उपस्थित असल्याची चर्चा आहे.

दिल्लीतून परवानगी?

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. शिंदेंच्या अचानक दिल्ली दौरा का केला याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, ऑपरेशन टायगरसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.

उद्धव ठाकरेंची बैठक पण...

ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होताच उद्धव ठाकरेंनी काही दिवासांपूर्वी आपल्या खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी खासदारांशी संवाद साधत तुम्ही आहात म्हणून मी लढतो आहे, अशी भावनिक साद घातली होती. मात्र, खासदारांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मदत मिळाली नाही. प्रचारासाठी आदित्य ठाकरे देखील आले नाहीत, अशी भावना व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरले पाहिजे, असे मत व्यक्त केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT