

Mumbai News: राज्यात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एक महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. यात एकनाथ शिंदेंच्या आमदाराच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मतदारसंघाच्या निवडणुकीचे ईव्हीएम तपासण्याचे आदेश दिले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत मुंबई उपनगरातील चांदिवली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ही निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या नसीम खान यांच्याविरोधात लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या लांडे यांनी काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांना पराभवाचा धक्का दिला होता.याच निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खान यांनी याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी(ता.9 एप्रिल) ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. हा आदेश न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी दिला आहे. या प्रकरणात काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान याचिकाकर्ते असून तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत.
EVM उत्पादक कंपनी असलेल्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू’ यांच्याकडून येत्या 16 आणि 17 एप्रिल रोजी मुंबईत केवळ निदान चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचं पत्र हे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उप-निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नसीम खान यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नसीम खान म्हणाले की, भारताच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडलेलं नसून निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत EVM ची तपासणी किंवा तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. हा एक ऐतिहासिक आदेश असल्याचंही खान यांनी म्हटलं.
चांदिवली विधानसभा मतदारसंघात 2019 नंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी काँग्रेसच्या नसीम खान यांचा पराभव केला आहे. खान हे यापूर्वी 2009 आणि 2014 मध्ये या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यामुळे चांदिवली मतदारसंघ हा नसीम खान यांचा बालेकिल्ला समजला जात होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.