ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य गळतीच्या चर्चांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची चर्चा राजकीय सूत्रांकडून केली जात आहे. दिल्लीतील घडामोडींना वेग आला असून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे लोकसभेतील एकूण 9 खासदार आहेत. त्यामध्ये अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. मात्र यापैकी 6 खासदार शिंदे गटाच्या बाजूने जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
संजय जाधव,
संजय देशमुख,
नागेश पाटील आष्टीकर,
ओमराजे निंबाळकर,
भाऊसाहेब वाकचौरे,
संजय दिना पाटील
या खासदारांची नावे संभाव्य गटबदलाच्या चर्चेत आघाडीवर आहेत. जर या खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतली, तर पक्षांतरबंदी कायद्यातील दोन-तृतीयांश सदस्यसंख्येची अट पूर्ण होऊ शकते. त्यामुळे या खासदारांना स्वतंत्र गट स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या खासदारांना आपल्या गटात कायम ठेवण्यासाठी ठाकरे यांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र सत्तेतील सहभाग, भविष्यातील राजकीय संधी आणि मतदारसंघांच्या विकासासाठी निधीची हमी यांसारख्या मुद्द्यांमुळे काही खासदारांचा कल शिंदे गटाकडे वाढल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत लोकसभा आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.