Operation Tiger : ओम राजेनिंबाळकर कसे फुटले? कोणावर होती जबाबदारी? पुण्यातून दिल्लीला कसे पोहोचले? वाचा Inside Story

Omraje Nimbalkar Delhi Visit : ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे खासदार ओम राजेनिंबाळकर हे देखील एका खाजगी विमानाने दिल्लीला गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मंगळवारी रात्री १ वाजता पुण्यातून एका खासगी विमानाने ते दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Omraje Nimbalkar Delhi Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर आता ठाकरेंच्या काही नेत्यांनी देखील शिक्कामोर्तब केलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खासदारांना विमानातून उचलून नेल्याचा दावा केला आहे. एका विमानाचा फोटो शेअर करत नांदेड विमानतळावरून याच चार्टड विमानातून संजय जाधव आणि संजय देशमुख या दोन खासदारांना उचलून नेल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू समजले जाणारे खासदार ओम राजेनिंबाळकर हे देखील एका खाजगी विमानाने दिल्लीला गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मंगळवारी रात्री १ वाजता पुण्यातून एका खासगी विमानाने ते दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

ओम राजेनिंबाळकर आठवड्याभरापासून वैद्यकीय कारणास्तव पुण्यातच होते. मंगळवारी त्यांच्यासह इतर नेत्यांना दिल्लीला नेण्यासाठी पुणे विमानतळावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने २ खाजगी विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. ओम राजेनिंबाळकर यांच्या दिल्ली दौऱ्याची माहिती बाहेर येऊ नये यासाठी हा प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता.

Omraje Nimbalkar
Shivsena MP : 'ऑपरेशन टायगर'च्या नावाखाली 2 खासदारांना उचलून नेलं; थेट 'त्या' विमानाचा फोटो शेअर करत राऊतांचा खळबळजनक दावा

काल दिवसभरात या विमानांच्या उड्डाणाच्या वेळेत अनेकदा बदल करण्यात आला होता. अखेर रात्री १ वाजता खाजगी विमानाने ओम राजेनिंबाळकर पुण्यातून दिल्लीकडे रवाना झाले आणि आता ते दिल्लीत असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे नेते तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर ओम राजेनिंबाळकर यांना एकनाथ शिंदेंकडे घेऊन येण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

महत्त्वाची बाब म्हणजे, या विशेष विमानातून ओम राजेनिंबाळकर यांच्यासोबत महायुतीचे नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत देखील दिल्लीला गेल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.

Omraje Nimbalkar
Operation Tiger News: ‘ऑपरेशन टायगर’चे पुणे कनेक्शन! नाना भानगिरेंच्या पोस्टर्समुळे खळबळ; स्क्रिप्ट आधीच तयार होती?

सध्या सुरु असलेल्या कायदेशीर खटल्यात मदत करणे, मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी अशा विविध गोष्टींचा शब्द दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. खासदार संजय राऊत यांनीही आपल्या पत्रकार परिषदेत देखील अशाच प्रकारचा आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Sanjay Raut  Operation Tiger | Shiv Sena MPs Defection |
Operation Tiger Maharashtra
Om Raje Nimabalkar_Pawan Raje Nimbalkar
Uddhav Thackray, Eknath Shinde
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com