Shivsena ubt MP Nagesh Patil sarkarnama
महाराष्ट्र

Operation Tiger : ऑपरेशन टायगर फसले! ठाकरेंच्या खासदाराने केला 'त्या' भेटीचा खुलासा!

Shivsena ubt MP Nagesh Patil : शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्याच्या कार्यक्रमाला ठाकरेंचे खासदार उपस्थित राहिल्याने ऑपरेशन टायगर सक्रीय झाल्याची चर्चा होत्या.

Roshan More

Shivsena News : उद्धव ठाकरेंच्या खासदार फोडत ऑपरेशन टायगर राबवण्यात येण्याच्या चर्चा आहे. ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक घेत खासदारांशी संवाद देखील साधला. त्यानंतर आज अचानक ठाकरेंचे दोन खासदार शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी डीनर डिप्लोमसीला उपस्थिती राहिल्याची माहिती समोर आल्याने ऑपरेशन टायगर सक्रीय झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

या चर्चेनंतर डीनर डिप्लोमसीला उपस्थित राहिलेले ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, जाधवसाहेब आणि माझे जुने संबंध आहेत. त्यांची अ‍ॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम होता. त्यांनी जेवणाचे निमंत्रण दिले होते. म्हणून गेलो होतो. पाच दहा मिनिटांमध्ये काय राजकीय चर्चा होणार आहे, असे म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगरची हवा देखील काढून टाकली.

माझ्या आगोदर खासदार संजय देशमुख देखील तेथे होते. मात्र, कोणाशीही कसली राजकीय चर्चा झाली नाही. निमंत्रणावरून आम्ही गेलो होतो. काही केलच नाही तर डर कशाला आहे. त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावाले तेथे असतात त्यांनी फोटो काढून टाकला असेल.

...तर ऑपरेशन टायगरची चर्चा

ऑपरेशन टायगर विषयी आष्टीकरणांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, काही बातम्या नसल्या की ऑपरेशन टायगरची चर्चा होते. पण त्यात तथ्य नाही. एकाच सभागृहातील असल्याने या भेटीत काही गैर नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT