Maharashtra Politics : ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंचा खासदार अमित शहांना भेटला!

Sanjay Jadhav News : राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना झालेल्या या भेटीने राजकारण ढवळून निघाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार पक्षांतर करणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
Amit Shah, Sanjay jadhav
Amit Shah, Sanjay jadhav Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT-BJP News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना झालेल्या या भेटीने राजकारण ढवळून निघाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार पक्षांतर करणार अशा चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरेंनीही खबरदारी म्हणून आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून त्यांना आणाभाका घ्यायला लावल्या.

विशेष म्हणजे मुंबईच्या या बैठकीत परभणीचे खासदार संजय जाधव गैरहजर राहिल्याने त्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच त्यांनी आता नुकतीच दिल्लीत थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. अर्थात ही भेट पुढील वर्षी होणाऱ्या देशातील जनगणना कार्यक्रमात भटके विमुक्त समाज आणि आदिवासी यांच्यासाठी स्वतंत्र काॅलम ठेवण्याच्या मागणीसाठी घेतली आहे.

Amit Shah, Sanjay jadhav
Sanjay Jadhav : उद्धव ठाकरेंचा परभणीचा 'वाघ'; शिंदेच्या ऑपरेशन 'टायगर'मध्ये अडकणार का?

संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी स्वतः ही माहिती आपल्या सोशल मिडिया पेजवरून भेटीचे छायाचित्र पोस्ट करत दिली आहे. आज माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी यांची भेट घेऊन जनगणना 2027 मध्ये भटके विमुक्त (VJNT) समाज आणि आदिवासी समाज यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याची मागणी केली. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली तरीही या समाजाची योग्य गणना होत नाही.

Amit Shah, Sanjay jadhav
Maharashtra Live News Update: 'त्या' सर्व शेतकर्‍यांचे फार्मर आयडी बंद केले जाणार: महसूल मंत्री बावनकुळे

रोजगारासाठी सतत भटकत राहणारा हा समाज आहे. त्यांना पक्के घर नाही, ते रस्त्यावर किंवा छोट्या झोपडीत राहतात. त्यामुळे सूचीकरणात त्यांची नोंद राहत नाही. या समाजासाठी अंतिम संस्कारासाठीही निश्चित जागा नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. तरी, भटके विमुक्त, आदिवासी समाजाच्या जनगणनेसाठी एक स्वतंत्र कॉलम तयार करावा, जेणेकरून योग्य नोंद होईल व त्यांना न्याय मिळू शकेल, असे संजय जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Amit Shah, Sanjay jadhav
Maharashtra Budget 2026 Live Update : ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका, म्हणाले,'चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना....'

तीन टर्म खासदार

संजय जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार आहेत. ही त्यांची तिसरी टर्म आहे. ते दोन वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. राज्यात शिवसेना पक्षात बंड झाले, परंतु संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेत आपली निष्ठा दाखवली. नुकत्याच झालेल्या परभणी महापालिकेत शिवसेना महाविकास आघाडीची सत्ता आणि मुस्लिम महापौर केल्यानंतर संजय जाधव यांचे चांगलेच चर्चे आले आहेत.

Amit Shah, Sanjay jadhav
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये अस्वस्थता! ऑपरेशन टायगर होणारच; शिंदेंच्या मंत्र्याने दिले ओपन चॅलेंज

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे संजय जाधव उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करणार, अशी कुजबुज सुरू झाली आहे. अशा संशयाच्या वातावरणात त्यांनी भाजपाचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Amit Shah, Sanjay jadhav
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये अस्वस्थता! ऑपरेशन टायगर होणारच; शिंदेंच्या मंत्र्याने दिले ओपन चॅलेंज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com