Aaditya Thackeray, CM Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Dasara Melawa News : हे सरकार पुन्हा डोक्यावर आलं तर मंत्रालयही गुजरातला नेतील!

Jagdish Pansare

Aditya Thackeray Speech News : दावोसला जाऊन दोन दिवसात 46 कोटी रुपये खर्च होऊ शकतात का? पण मिंधे सरकारने करून दाखवले आहे. दोन वर्षात मुंबईची लूट आणि महाराष्ट्रातील सगळे प्रकल्प मित्रांच्या खिशात घालणारे हे सरकार पुन्हा सत्तेवर येता कामा नये. हे पुन्हा सत्तेवर आले तर मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील, असा टोला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महायुतील सरकारला लगावला.

मुंबई येथील दसरा मेळाव्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पहिल्यादा भाषण केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारावर हल्ला चढवताना आदित्य ठाकरे चांगेलच आक्रमक झाले. महिनाभरात आपले सरकार महाराष्ट्रात पुन्हा येत आहे. मिंधे सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची प्रत्येक फाईल आपल्याकडे आहे. त्या सगळ्या बाहेर काढल्या जातील, सरकारी अधिकाऱ्यांनी यात पडू नये नाहीतर त्यांनाही तुरुंगात टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी दिला.

दसरा मेळाव्यात पहिल्यांदा भाषण करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. आमची ही लढाई महाराष्ट्राची जी लूट सुरू आहे त्याविरोधात आहे. सुरतेच्या लुटीचा बदला आताचे महायुती सरकार घेत आहे का? असा प्रश्न पडावा, असं महाराष्ट्राला ओरबडलं जातयं हे रोखण्यासाठीची ही लढाई आहे. दोन वर्षात मुंबईची लूट आणि महाराष्ट्रातील सगळे प्रकल्प मित्रांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे.

स्वतःसाठी खोके, महाराष्ट्राला धोके असा सगळा कारभार सुरू आहे. पण महाराष्ट्र झुकणार तुमच्यासमोर झुकणार नाही. एका महिन्यात आमचे सरकार येत आहे, प्रत्येकाची फाईल बाहेर काढणार. (Shivsena) तुम्हाला आत टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांच्या दावोस दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारी खर्चावर टीका केली.

दावोसला जाऊन दोन दिवसात 45 कोटी खर्च केले जाऊ शकतात का? पण या सरकारने ते करुन दाखवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही घोटाळे करणारे हे सरकार आहे. आता तुम्हाला घरी बसवणार, जेलमध्ये टाकणार. आम्ही राज्यात साडेसहा लाख कोटींचे उद्योग आणले होते. हे सरकार पुन्हा डोक्यावर बसलं तर हे मंत्रालयही गुजरातला नेतील, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी घोटाळेबाज सरकारला सोडणार नाही, असा इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT