Vice Chancellor selection dispute 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Vice Chancellor selection dispute : राहुरी कृषी विद्यापीठावर राज्याबाहेरील कुलगुरू? निवड प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्हं

Controversy Over Vice Chancellor Selection at Rahuri Mahatma Phule Agriculture University : अहिल्यानगरच्या राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra agricultural university news : परभणी विद्यापीठानंतर अहिल्यानगरच्या राहुरीमध्येही राज्याबाहेरील कुलगुरूंची निवड केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवड समितीवर बाहेरच्या राज्यातील प्राध्यापक आणि तज्ज्ञांची निवड केली गेली आहे.

समन्वय समितीवर देखील बाहेरच्या राज्यातील प्राध्यापकांची निवडीनं वेगळीच चर्चा आहे. कुलगुरू निवडीच्या समित्यांवर बाहेरच्या राज्यातील तज्ज्ञांच्या निवडीमुळे राज्यातील कुलगुरूंच्या निवड प्रक्रिया चर्चेत अन् वादात सापडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

राहुरी (Rahuri) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी निवड समितीच्या समन्वय अधिकारीपदी कोईम्बतूरच्या भरतियार विद्यापीठाच्या गणित विभागातील प्राध्यापक डाॅ. एस. सर्वानन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याबाहेरील प्राध्यापकाची समन्वय अधिकारीपदी निवड का, असा प्रश्न केला जात आहे.

कुलगुरू डाॅ. प्रशांतकुमार पाटील यांच्या निधनामुळे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरूपद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा होती. कुलगुरू निवडीचे अधिकार राज्यपालांकडे असल्याने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

परंतु, कोईम्बतूरच्या भरतियार विद्यापीठाचे निवड समितीच्या समन्वय अधिकारीपदी प्राध्यापकाची निवड केली. राज्यपाल देखील कोईम्बतूरचे आहे. त्यामुळे या योगायोगाची जोरदार चर्चा आहे. या योगायोगामुळे निवड प्रक्रिया चर्चेत आणि अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.

परभणीच्या विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून उत्तर प्रदेशातील डाॅ. इंद्रामणी यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राज्याबाहेरील तज्ज्ञाची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT