Parbhani News: आपले आमदार मुंबईला अन् खासदार दिल्लीला असतात, मग गल्लीतील कामे कोण करणार? गल्लीतील गटार तुंबली, रस्ता खराब झाला तर मग आपण सरपंचाकडे जातो, पण हा सरंपच आपलं काम करीत नसेल तर तक्रार कुणाकडे करायची?
सरपंच हा जर थेट जनतेतून निवडून आला असेल तर त्याला घरी कसं पाठवायचं, याबाबत प्रशासनाच्या नियमानुसार त्याला घरी पाठवता येते. अशाच प्रकार मराठवाड्यात नुकताच घडला. महाराष्ट्राचा राजकारणात असं पहिल्यांदाच घडलं. एका सरपंचाला सदस्यांनी घरचा रस्ता दाखवला.
परभणीच्या सेलू तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सदस्यांनी 'माज नाय करायचा' हे सरपंचाला दाखवून दिलं. कुपटा ग्रामपंचायतीत थेट जनतेतून निवडून आलेल्या महिला सरपंचाला पद सोडावं लागलं. रुख्मिणी गवळे असं या सरपंचाचं नाव आहे. महिला आरक्षणामुळे रुख्मिणी गवळे सरपंच झाल्या होत्या. 25 महिने त्या या पदावर राहिल्या.
रुख्मिणी गवळे यांच्याविरोधात 9 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. ग्रामस्थांची कामे करीत नसल्याचे सांगत सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. नऊ पैकी नऊ सदस्य विरोधात गेले.
ग्राम पंचायत सदस्यांच्या पाठीशी मतदार ठामपणे उभे राहिले. ग्रामसभेत झालेल्या मतदानामध्ये 403 उपस्थितांपैकी 351 मतदारांनी अविश्वास ठरावाच्या बाजूनं हात वर करुन मतदान केलं. तर 17 नागरिकांनी ठरावाविरोधात मतं दिली. 35 जणांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
अविश्वास ठराव बहुमतानं मंजूर झाल्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमानुसार आता पुढील कार्यकाळासाठी उपसरपंच ग्रामपंचायतीचा कार्यभार हाकणार आहे. गवळे या अडीच वर्षापूर्वी जनतेनं भरघोस मतांनी सरपंचपदी निवडून आल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.