Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : बड्या घराण्यांच्या गर्दीत या नेत्याने तब्बल 22 वर्षे राखली मंत्रिपदाची 'गादी'

Mahayuti Government : आतापर्यंत 22 वर्ष मंत्रि‍पदावर राहणाऱ्या या नेत्यांनी महायुती सरकारच्या काळात देखील मंत्रीपदावर आपले नाव कोरले आहे. तर प्रकाश अबिटकर हे थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळवणारे जिल्ह्यातील तिसरे आमदार ठरले आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मंत्रि‍पदावर वर्णी कुणाची लागणारे याची उत्सुकताच संपल्यानंतर आता खाते वाटपाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. अशातच जिल्ह्यात आतापर्यंत किती आमदाराने मंत्रि‍पदावर आपले नाव कोरले आहे. याची चर्चा आता देखील जोर धरू लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 14 आमदारांनी मंत्रि‍पदावर आपले नाव कोरले असून सर्वाधिक मंत्रीपदावर राहणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणजे हसन मुश्रीफ (Hasan Mushrif). त्यांनी आतापर्यंत 22 वर्ष मंत्रि‍पदावर राहिले असून महायुती सरकारच्या काळात देखील मंत्रीपदावर आपले नाव कोरले आहे. तर प्रकाश अबिटकर हे थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळवणारे जिल्ह्यातील तिसरे आमदार ठरले आहेत.

कोल्हापुरात आतापर्यंत 14 आमदारांना राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रि‍पदापर्यंत झेप घेता आली आहे. माजी मंत्री जयवंतराव आवळे व डॉ. विनय कोरे यांनी थेट कॅबिनेट मंत्रि‍पदावर आपली मोहर उमटवली होती. तर हसन मुश्रीफ यांनी राज्य मंत्रि‍पदापासून सुरुवात केली होती. 1999 ते 2009 पर्यंत त्यांनी आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री पदावर काम केले होते. नंतर 2009 पासून आघाडी सरकारच्या काळात त्यांना कामगार मंत्री पदावर संधी देण्यात आली होती. 2019 च्या महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात ग्राम विकास मंत्री, तर महायुतीच्या काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री हे पद देण्यात आले होते.

जयवंतराव आवळे हे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिले होते. दुसऱ्या टर्म नंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर घेण्यात आले होते. तर आघाडी सरकारच्या काळात जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे यांना ऊर्जामंत्री पदावर पहिल्याच प्रयत्नात संधी देण्यात आली होती. त्यानंतर प्रकाश अबिटकर यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदावर घेण्यात आले.

आतापर्यंत कोण कोण मंत्री झाले?

दिवंगत रत्नाप्पा कुंभार यांना राज्यमंत्री, नंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री हे खाते होते. तर दिवंगत उदयसिंगराव गायकवाड, दिवंगत श्रीपतराव बोंद्रे, दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी राज्यमंत्री, तर दिवंगत दिविजय खानविलकर, दिवंगत बाबासाहेब कुपेकर, हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीला राज्यमंत्री , तर नंतर कॅबिनेट मंत्री जयवंतराव आवळे थेट कॅबिनेट मंत्री, कल्लापा आवाडे, प्रकाश आवाडे सुरुवातीला राज्यमंत्री, तर नंतर कॅबिनेट मंत्री होते. भरमू पाटील युतीच्या काळात राज्यमंत्री होते, तर डॉ. विनय कोरे यांनी आघाडीच्या काळात कॅबिनेट मंत्री होते. आमदार सतेज पाटील दोनवेळा राज्यमंत्री राहिले, तर प्रकाश अबिटकर हे पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT