Dharmaraj Kadadi : विधानसभा निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय चुकला, डावपेचात कमी पडलो; धर्मराज काडादींची कबुली

Assembly Election 2024 : निवडणुकीचं राजकारण समजलं. पण, राजकारणातील डावपेच समजले नाहीत. राजकारणातील डावपेचात माझा वापर झाला, असे म्हणता येणार नाही. पण, मी निवडणुकीत सरळपणे गेलो आणि त्याच्या आहारी गेलो, असे समजू शकता.
Dharmaraj Kadadi
Dharmaraj KadadiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 December : सोलापूर दक्षिण मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवलेले सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी विधानसभेतील पराभवावर प्रथमच भाष्य केले. विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय मी स्वतः घेतला. पण, माझा तो निर्णय चुकला. राजकारणातील डावपेच समजून घेण्यात आणि ते आखण्यात मी कमी पडलो, अशी कबुली काडादी यांनी दिली.

श्री सिद्धरामेश्वर यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवस्थानचे प्रमुख धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यावर आणि त्यातील अपयशावर भाष्य केले. ते म्हणाले, ईव्हीएमच्या संदर्भात माझा काही अभ्यास नाही, त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय मी स्वतः घेतला होता. तो माझा निर्णय चुकला. त्याची सगळी जबाबदारी माझी आहे. त्याबाबत मी कोणालाही दोषी ठरवत नाही.

अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी जी यंत्रणा हाती लागते, जी पूर्वतयारी लागते, त्यात कमी असतानाही मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने तीही माझीच जबाबदारी होती. विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) जे काही मोठं अपयश आलं, त्याला सर्वस्वी मी स्वतः जबाबदार आहे, असेही काडादी यांनी स्पष्ट केले.

Dharmaraj Kadadi
Chhagan Bhujbal : भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलणे, ही तर जरांगेंची इच्छापूर्ती; ओबीसी नेत्यांचा हल्लाबोल

निवडणुकीसंदर्भातील जो काही निर्णय घेतला, तो मी घेतला आहे. त्यात दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. पण, निवडणुकीतील डावपेच समजून घेण्यात आणि ते डावपेच आखण्यात मी कमी पडलो, एवढं मात्र मी सांगतो. निवडणुकीचं राजकारण समजलं. पण, राजकारणातील डावपेच समजले नाहीत. राजकारणातील डावपेचात माझा वापर झाला, असे म्हणता येणार नाही. पण, मी निवडणुकीत सरळपणे गेलो आणि त्याच्या आहारी गेलो, असे समजू शकता, असे सूचक विधानही काडादी यांनी केले.

Dharmaraj Kadadi
Sadabhau Khot : महायुतीमधील तीनही पक्षांनी आमच्याकडून त्यांची शेतं नांगरून घेतली अन्‌ आमची वेळ आली तेव्हा... सदाभाऊंची नाराजी

ज्यांना साध्य करायचं होतं, त्यांनी साध्य केलं का, यावर आपण काही बोलायचं नाही, असंही उत्तर काडादी यांनी दिलं. निवडणुकीतील अपयशाला मी कोणालाही दोषी धरत नाही. माझे मन मोठं आहे, असं नाही तर निवडणुकीतील ती वस्तुस्थिती आहे, तेच मी बोलत आहे, असेही काडादी यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com