Solapur Loksabha Election 2024 Voting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election voting 2024 : सकाळी 11पर्यंत सोलापुरात 16.17 तर माढ्यात 15.27 टक्के मतदान; फलटण-माळशिरसमध्ये चुरस

Solapur-Madha Lok sabha : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 20.50 टक्के मतदानाची नोंद दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात झाली असून सर्वांत कमी 12.34 टक्के मतदान अक्कलकोटमध्ये झाले आहे. माढ्यात फलटण आणि माळशिरसमध्ये तीव्र चुरस दिसून येत आहे. फलटणमध्ये 18.54 टक्के, तर माळशिरसमध्ये 18.48 टक्के मतदान झाले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 May : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढताना दिसत आहे. सकाळी 11 पर्यंत सोलापूर मतदारसंघात 16.17 टक्के, तर माढा लोकसभा मतदारसंघात 15.27 टक्के मतदान झाले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 20.50 टक्के मतदानाची नोंद दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात झाली असून सर्वांत कमी 12.34 टक्के मतदान अक्कलकोटमध्ये झाले आहे. माढ्यात फलटण आणि माळशिरसमध्ये तीव्र चुरस दिसून येत आहे. फलटणमध्ये 18.54 टक्के, तर माळशिरसमध्ये 18.48 टक्के मतदान झाले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात झाले असून ते 20.50 टक्के इतके आहे, तर सर्वात कमी मतदान हे अक्कलकोट मतदारसंघात झाले असून ते 12.34 टक्के आहे. याशिवाय मोहोळ मतदारसंघात 17.26 टक्के, सोलापूर शहर उत्तर मध्ये 18.71, सोलापूर शहर मध्य मतदारसंघात 13.13, पंढरपूर मतदारसंघात 15.32 टक्के मतदान झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढा लोकसभा मतदारसंघात फलटण आणि माळशिरस मतदारसंघात मतदानासाठी जोरदार चुरस दिसून येत आहे. या ठिकाणी काही पॉईंटचा फरक दिसून येत आहे. सर्वाधिक मतदान हे फलटणमध्ये झाले असून ते 18.54, तर माळशिरसमध्ये टक्के 18.48 टक्के एवढे मतदान झाले आहे. माळशिरस आणि फलटणनंतर सर्वाधिक मतदान हे करमाळा तालुक्यात झाले असून ते 16.62% एवढे आहे, तर माढ्यात 12.90%, सांगोल्यात 14.20% तर माण मध्ये 11.04 एवढे मतदान झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात 15.27 टक्के मतदान अकरा वाजेपर्यंत झाले आहे.

दिवसभराची उन्हाची तीव्रता लक्षात घेता राजकीय पक्षांनी सकाळपासूनच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड सुरू आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रावर मतदान बिघाडांच्या किरकोळ घटना वगळता सोलापूर आणि माढ्यात शांतेत मतदान सुरू आहे. ऊन असल्यामुळे प्रशासनाचे मंडपाची व्यवस्था केली आहे. मात्र, काही ठिकाणी ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे मतदारांनी उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी छत्रीचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे.

अनेक राजकीय नेत्यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान केंद्राला भेटी देत आहेत. उमेदवारांनी मतदानाचा आपला हक्क बजावून मतदान केंद्राची पाहणी करत आहेत. त्यामुळे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT