Osmanabad Lok Sabha Election 2024: अर्चनाताई पाटील, ओमराजे निंबाळकर यांनी केले मतदान

Loksabha Election : आमदार राणाजगजितसिंह पाटील माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनीही तेर केंद्रावर सकाळी लवकर मतदान केले. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी.
Osmanabad Lok Sabha Election
Osmanabad Lok Sabha ElectionSarkarnama

Dharashiv Loksabha Election 2024 : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात सकाळच्या टप्प्यात मतदानासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. कडाक्याचे ऊन पडणार हे लक्षात घेऊन नागरिकांनी सकाळी लवकर मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चनाताई राणाजगजतिसिंह पाटील (Archana Patil) यांनी सकाळी तेर (ता. धाराशिव) येथील केंद्रावर मतदान केले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranjitsingh Patil) , माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (Padmasingh Patil) यांनीही तेर केंद्रावर सकाळी लवकर मतदान केले. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje nimbalkar) यांनी. गोवर्धनवाडी (ता. धाराशिव) येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले.

धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी सारोळा (ता.धाराशिव) केंद्रावर मतदान केले. उमरगा - लोहाऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उमरगा येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या केंद्रावर मतदान केले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 पर्यंत 5.40 टक्के मतदान झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Osmanabad Lok Sabha Election
Lok Sabha Election 2024 Voting Live : जनता इंडिया आघाडीला साथ देईल, देशात सत्तांतर होणार; पृथ्वीराज चव्हाण यांना विश्वास

मतदान हा नागरिकांना व्यक्त होण्याचा लोकशाहीचा महत्वाचा (Loksabha Election 2024) उत्सव आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षांत जे राजकारण झाले, लोकशाहीची तत्वे पायदळी तुडवण्यात आली, पक्ष हिसकावून घेण्यात आले, हे नागरिकांनवा आवडलेले नाही.

लोकांना गृहीत धरून गेल्या अडीच वर्षांत राजकारण केले गेले. या सर्व बाबींचा विचार नागरिकांनी केलेला आहे. त्यांना ते आवडलेले नाही. संधीसाधूपणा, पैशांचे आमिष, ईडी सीबीआयच्या धाकाने सत्ताधाऱ्यांनी राजकारण केले आहे.

या सर्व प्रकारांना चोख उत्तर देण्याची संधी मतदारांना आता उपलब्ध झाली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे. मतदारांसाठी झटणारा खासदार निवडावा, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मतदानानंतर केले.

Osmanabad Lok Sabha Election
Pune Loksabha Election : 'उद्धव ठाकरे हे खरे गद्दार; शिंदे, बारणे हे खुद्दार', फडणवीसांचा हल्ला अन् कौतुकही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com