सोलापूर : महाराष्ट्र (Maharashtra) -कर्नाटक (Karnataka) सीमावाद पेटलेला असतानाच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील १८ गावांनी कर्नाटकात जाण्याची तयारी दाखवली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील काही गावांनी यापूर्वीच असा ठराव केला हेाता. त्यामुळे जतबरोबरच सोलापूरच्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील १८ गावातील गावकऱ्यांनी आमचा कर्नाटकात समावेश करावा, अशी मागणी केली आहे. (18 villages of Solapur district eager to move to Karnataka)
सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव, कोर्सगाव, मुंडेवाडी, कुमठे, केगाव बुद्रूक, केगांव खुर्द, चिंचोली नजीक, सुलेरजवळगे, तडवळ, शेगाव, धारसंग, कल्लकजोळ आदी गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची मागणी करणाऱ्यांत समावेश आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावे आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा सांगितला होता. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. ते ताजे असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात जाण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे. पायाभूत सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांनी कर्नाटकात जाण्यास पसंती दिली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील १८ गावच्या गावाकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. आम्हाला रस्ता, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नसल्याने आम्ही वैतागून या निर्णयापर्यत पोचलो आहेत, असेही गावकऱ्यांनी सांगितले. हे गावकरी उद्या (बुधवारी, ता. ३० नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देणार आहेत.
दरम्यान, जत तालुक्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच आमदार विक्रम सावंत यांच्यासोबत बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर त्यांनी जतवर अन्याय होऊ देणार नाही. जतच्या समस्यांबाबत पुढील आठवड्यातील बैठकीत मोठा निर्णय घेण्याचे संकेतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.