Indapur Bjp : इंदापूर भाजपमध्ये इनकमिंग सुरू; हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीच्या भरणेंना धक्का

बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच दादाराम काळेल यांचा भाजपमध्ये प्रवेश
Sarpanch Dadaram Kalel joins BJP
Sarpanch Dadaram Kalel joins BJPSarkarnama
Published on
Updated on

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर (Indapur) तालुक्यातील बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सरपंच दादाराम काळेल यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मागील आठवड्यातच काजड येथील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. आता बिजवडीच्या सरपंचांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे इंदापूर तालुक्यात भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. (Bijwadi Group Gram Panchayat Sarpanch Dadaram Kalel joins BJP)

बिजवडी येथे सोमवारी (ता.२८ नोव्हेंबर) माजी सहकार मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले सरपंच दादाराम काळेल व कार्यकर्त्यांचा सत्कार केला. या वेळी छगन भोंगळे, नारायण वीर, मच्छिंद्र अभंग, हिरालाल पारेकर, दिलीप भिसे, काळेल गुरुजी उपस्थित होते. काळेल यांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादीला पर्यायाने माजी मंत्री दत्तात्रेय भरणे यांना धक्का मानला जात आहे.

Sarpanch Dadaram Kalel joins BJP
Jat News : जतसंदर्भात पुढच्या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय होणार; आमदार सावंतांनी घेतली शिंदेंची भेट

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपने जोरदार इनकमिंग सुरू केल्याची चर्चा होत आहे. अनेक आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्के बसत आहेत.

Sarpanch Dadaram Kalel joins BJP
Jayant Patil : पत्रिका दिली; मातोश्रीवर फोन केले, तरीही ठाकरे जयंतरावांच्या मुलाच्या लग्नाला आलेच नाहीत

इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीलाल बोराटे, स्वप्निल सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर दोनच दिवसांपूर्वीच काझड येतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि आता बिजवडीच्या सरपंचांनीच पक्ष सोडला आहे. त्यामुळे भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com