Jaykumar Gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pakistani citizen In Solapur : सोलापूरमध्ये 25 पाकिस्तानी नागरिक; पण ते सिंधी-हिंदू : पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती

Jaykumar Gore Information : पाकिस्तातून आलेले हे नागरिक कशासाठी सोलापूरमध्ये आले आहेत, यासंदर्भात मी माहिती घेतलेली नाही. पण आपण त्यांना लॉंगटाईम व्हिसा दिला असेल तर काहीतरी कारण बघून दिला असेल.

Vijaykumar Dudhale, विश्वभूषण लिमये

Solapur, 25 April : सोलापूर जिल्ह्यात साधारणतः 25 च्या आसपास पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यापैकी लॉंगटाईम व्हिसा असलेले 10-11 लोक आहेत. 14 लोकांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे. परंतु आत्ताच माझी पोलिस आयुक्तांशी चर्चा झाली आहे, ते सिंधी-हिंदू आहेत. ज्या हिंदू बांधवांना पाकिस्तानमध्ये त्रास होतो, त्या त्रासाला कंटाळून आलेले काही लोक असू शकतात, जर ते हिंदू असतील तर त्यांच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. मी माझी भूमिका सरकारकडे मांडेन, असे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सायंकाळी सोलापूर शहरात पत्रकार परिषद घेऊन गोरे यांनी पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सोलापूमध्ये सुमारे 25 च्या आसपास पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यातील 14 लोकांना परत पाठविण्यासारखी परिस्थिती आहे. यासंदर्भात मी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे, त्याचा विचार करण्यात येईल.

पाकिस्तातून आलेले हे नागरिक कशासाठी सोलापूरमध्ये (Solapur) आले आहेत, यासंदर्भात मी माहिती घेतलेली नाही. पण आपण त्यांना लॉंगटाईम व्हिसा दिला असेल तर काहीतरी कारण बघून दिला असेल. ज्या हिंदू बांधवांना पाकिस्तानमध्ये त्रास होतो, त्या त्रासाला कंटाळून आलेले काही लोक असू शकतात जर ते हिंदू असतील तर त्यांच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. तेवढा मोठा मी नाही. पण मी माझी भूमिका नक्की सरकारकडे मांडेन, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील

कश्मीरमधील हल्ल्यासंदर्भात गोरे म्हणाले, कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणावरून देशातील सर्वांच्या मनात प्रचंड चीड आहे. प्रचंड चीड आणणारं हे कृत्य आहे. नक्की याला उत्तर द्यावे लागेल. नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुठेही असला तरी त्याला शोधून त्याचा खात्मा केला जाईल. त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील.

शरद पवार मोठे नेते; पण....

शरद पवार यांनी केलेल्या विधानावर गोरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, शरद पवार मोठे नेते आहेत. मात्र, अशा प्रसंगी प्रश्न निर्माण करणे, ही त्यांची जुनी सवय आहे. मात्र देश एकत्र आहे. देशाने एकत्र राहून मुकाबला केला पाहिजे. अशा संकटात या प्रवृत्तीचा नायनाट केला पाहिजे. अशावेळी सर्वानी एकत्र यायला हवे. कधी कधी पुलवामा हल्ल्यावरही शंका निर्माण केली, आता यावरही शंका घेतली जात आहे. मात्र त्याची चर्चा होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT