Solapur News: एका सरपंचासह सोलापूर जिल्ह्यातील 47 नागरिक श्रीनगरमध्ये अडकले; सर्वजण हाॅटेलमध्ये सुरक्षित

Pahalgam Terror Attack: सोलापूर जिल्ह्यातील आणखी काही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत, याची माहिती टुरिस्ट कंपन्यांशी संपर्क करून प्रशासन घेत आहे. जम्मू कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
Solapur and Pahalgam Terroist Attack.jpg
Solapur and Pahalgam Terroist Attack.jpgSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील पर्यटकावर दहशतवाद्यांनी मंगळवारी (ता. 22 एप्रिल) हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. सध्या माढा तालुक्यातील एका सरपंचासह जिल्ह्यातील 47 नागरिक श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न भारत सरकारच्या माध्यमातून सध्या सुरु आहेत.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील आणखी काही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत, याची माहिती टुरिस्ट कंपन्यांशी संपर्क करून प्रशासन घेत आहे. जम्मू कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार व प्रांताधिकारी यांची सकाळी बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना पर्यटकांच्या याद्या गावनिहाय करण्याबाबतचे निर्देश दिले आहे, तसेच टुरिस्ट ऑपरेटरांशी संपर्क साधून पर्यटकांची नावे घेण्याची सूचना केली आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व टुरिस्ट कंपन्यांकडून च्या संपर्कात असून त्यांच्याकडून पहलगाम येथे गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांचे नावे घेण्यात येत आहेत.

Solapur and Pahalgam Terroist Attack.jpg
Rajnath Singh On Pahalgam Attack: लवकरच पलटवार..! पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला; मोदी, शहांनंतर संरक्षणमंत्र्यांनीही दिले मोठे संकेत

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नातेवाईकांसाठी संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. पर्यटकांच्या नातेवाईकांनी त्यावर संपर्क साधून प्रशासनाला माहिती द्यावी. प्रशासनाच्या वतीने सर्व पर्यटकांना सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील 47 पर्यटक श्रीनगर येथे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली असून ते पर्यटक एकत्रित एका हॉटेलवर थांबलेले आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terriost Attack) मृत्यू पावलेल्या किंवा जखमी असलेल्या पर्यटकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरू नये. तसेच, ज्यांचे नातेवाईक जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले आहेत अशा नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Solapur and Pahalgam Terroist Attack.jpg
Kashmir Tourism Crisis : पहलगाम दहशतवादी हल्ला - 12 हजार कोटींचा पर्यटन व्यवसाय संकटात; अडीच लाख कश्मिरींच्या रोजगाराचा प्रश्न!

माढा तालुक्यातील पिंपळनेरचे सरपंच राहुल पेटकर हे 47 नागरिकांसोबत श्रीनगर येथे एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. पेटकर यांच्याशी तसेच पोलीस पाटील यांच्याशी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून त्यांच्या व सोबतच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेची माहिती घेतली आहे. श्रीनगर येथे अडकलेल्या पर्यटकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

संपर्क

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर

0217 2731012 (फक्त सोलापूर जिल्ह्याकरिता)

शक्तीसागर ढोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर - 9822515601

मदनसिंग परदेशी, सहाय्यक महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर - 9823065090

अरविंद चौगुले, महसूल सहाय्यक,जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर - 9359397524

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com