Dr. Shirish Valsangkar : अवघ्या दोन मिनिटांत संपवली सुनावणी; पोलिसांनी स्वतःहून मागितली मनीषा मुसळे-मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Solapur Crime News : आजची सुनावणी एकदम वायुवेगाने झाली. पोलिस संपूर्ण तयारी करून आल्याचे दिसून आले. पोलिसांच्या वतीने युक्तीवाद करताना चौकशीसाठी कस्टडीचे हक्क राखून मनीषा मुसळे-माने हिला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे, अशी मागणी केली हेाती.
Dr. Shirish Valsangkar suicide Case
Dr. Shirish Valsangkar suicide Case Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 April : प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने मुसळे हिला सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी स्वतःहून न्यायालयाने कोठडीची मागणी केली आणि पोलिसांचा युक्तीवाद मान्य करून न्यायालयाने अवघ्या दोन मिनिटांत सुनावणी संपवली. पोलिसांनी स्वतःहून न्यायालयीन कोठडी मागितल्याने संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिचे वकिल प्रशांत नवघिरे यांनी कोणताही युक्तीवाद केला नाही.

डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला शनिवारी (ता. १९ एप्रिल) रात्री सदर बझार पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर रविवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुरुवतीला तीन दिवसांची, तर त्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. वाढीव कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी आज मुसळे-माने हिला न्यायालयासमोर उभ केले होते.

दरम्यान, आजची सुनावणी एकदम वायुवेगाने झाली. पोलिस (Police) संपूर्ण तयारी करून आल्याचे दिसून आले. पोलिसांच्या वतीने युक्तीवाद करताना चौकशीसाठी कस्टडीचे हक्क राखून मनीषा मुसळे-माने हिला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे, अशी मागणी केली हेाती. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या एक मिनिटांत युक्तीवाद संपवला आणि न्यायालयाने दुसऱ्याच मिनिटात पोलिसांची युक्तिवाद मान्य करून मनीषा मुसळे माने हिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी स्वतःहून न्यायालयीन कोठडी मागितल्याने संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिचे वकिल प्रशांत नवघिरे यांनी कोणताही युक्तीवाद केला नाही.

Dr. Shirish Valsangkar suicide Case
Dr. Shirish Valsangkar : वळसंगकरांनी बाथरूममध्ये गोळी झाडली; पण पिस्टल सापडले बेडरूममध्ये, ‘आय एम सॉरी...’ मनीषा मानेच्या माफीनाम्यात काय म्हटलंय?

मनीषाची गुरुवारी साडेचार तास चौकशी

दरम्यान, पोलिस कोठडीच्या दुसऱ्या दिवशी मनीषाला सकाळी दहाच्या सुमारास चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर साधारणत: रात्री साडेनऊपर्यंत तिला सदर बझार पोलिस ठाण्यातच बसवून ठेवून आले होते. तिची गुरुवारी (ता. २४ एप्रिल) चार ते साडेचार चौकशी करण्यात आलेली आहे. वळसंगकर हॉस्पिटलमधील आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाबही पोलिसांनी घेतले आहेत, त्यात डॉक्टरांच्या सून डॉ. शोनाली यांचाही समावेश आहे.

Dr. Shirish Valsangkar suicide Case
Dr. Shirish Valsangkar : दीड वर्षापूर्वी एका डॉक्टरांसंदर्भात घेतलेला निर्णय डॉ अश्विन वळसंगकरांनी आपल्याच वडिलांबाबत का घेतला नाही?

झटपट सुनावणी

मनीषा मुसळे माने हिच्याकडून ई-मेलची मूळ प्रत जप्त करायची आहे, तिने कोणते खोटारडे आणि घाणेरडे आरोप केले होते, याचाही तपास करायचा आहे, फाडलेल्या ई-मेलचे तुकडे जप्त करायचे आहेत, आदींसह दहा बाबींसाठी पोलिसांनी मागील सुनावणीत पोलिस कोठडी मागितली हेाती. त्या तुलनेत आज पोलिसांनी कोणताही मोठा युक्तीवाद न करता अवघ्या दोन मिनिटांत न्यायालयाने कोठडी मागितल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com