Pune News : राज्यातील तब्बल २६ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती झालेली असतानाही संबंधितांना अद्याप जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शिक्षकांनी आता न्यायालयासह रस्त्यावरच्या लढ्याची तयारी सुरू केली आहे.
राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात आलेल्या आणि त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी १९८२ सालापासून लागू असलेली जुनी पेन्शन योजना मंजूर केली होती. मात्र, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वीपासून कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. अशा प्रकारच्या राज्यभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना अद्याप जुन्या पेन्शनचा लाभ मिळालेला नाही.
दोन वर्षांपूर्वी निर्णय, अंमलबजावणी मात्र रखडली
या प्रश्नावर शिक्षकांनी न्यायालयासह रस्त्यावरच्या लढ्याला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी शासनाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेली, मात्र त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र ठरलेल्या हजारो शिक्षकांमध्ये तब्बल २६ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची आहे. त्यामुळे या शिक्षकांनाही जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत आहे.
5 सप्टेंबरपासून जिल्हानिहाय मोर्चे
या मागणीसाठी शिक्षकांनी आता आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. 5 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येत आहेत. शासनाने २५ सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा २८ सप्टेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
"राज्य शासनाकडून अनुदान देणे किंवा नोकरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती १ नोव्हेंबर २००५ पूर्वी असते, तर त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली. केवळ त्यास शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेले शिक्षकच अपवाद आहेत. हा अन्याय दूर करावा," अशी मागणी शिक्षक नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता २६ हजार शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न शासन कधी निकाली काढणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.